शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
3
निवडणुकीत डिपॉझिट वाचवण्यासाठी उमेदवारांना किती मतांची गरज असते?; जाणून घ्या सविस्तर
4
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
5
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत?
6
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
7
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
8
करवीर ते कुलाबा 40 टक्के मतांचे अंतर; असे का ते समजून घ्या!
9
टक्क्याचा धक्का कुणाला? निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट
10
बीड जिल्ह्यात मतदान केंद्र फोडले; ४० जणांवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल
11
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
12
विशेष लेख: कट्टर उजवे आणि वादग्रस्त - ऑल द प्रेसिडेंट्स मेन....
13
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी
14
सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा
15
स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात
16
शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना: जयदेव आपटेंच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब
17
बारावी ११ फेब्रुवारी, दहावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; व्हायरल वेळापत्रकावर विश्वास न ठेवण्याचे बोर्डाचे आवाहन
18
यूजीसी नेट परीक्षा जानेवारीत होणार; १० डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार
19
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
20
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज

लोकसंख्येच्या घनतेपुढे पायाभूत सुविधा अपुऱ्या पडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2021 4:26 AM

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : मुंबई महानगर प्रदेशातील सर्वच महानगरांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्र शासनाच्या मिलिनियम प्लस शहरांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : मुंबई महानगर प्रदेशातील सर्वच महानगरांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्र शासनाच्या मिलिनियम प्लस शहरांच्या यादीतही या प्रदेेेशातील सर्वाधिक शहरे आहेत. या याेजनेंतर्गत केंद्र सरकारने येथील महानगरांतील प्रदूषण कमी करण्यासह पाणीपुरवठ्यासह इतर मूलभूत सुविधांसाठी कोट्यवधींची अनुदाने देऊ केली आहेत. मात्र, लोकसंख्येच्या वाढत्या घनतेपुढे महानगर प्रदेशातील सर्वच शहरांमध्ये वॉटर, मीटर, गटरच नव्हे सर्वच सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. सार्वजनिक बससेवा, लोकल सेवेसह आता मेट्रो १२ मार्गही आकार घेत आहेत. मात्र, तरीही वाढते उद्योग, आयटी पार्क, व्यापारउदीमामुळे प्रवाशांची गैरसोय कमी झालेली नाही.

राज्याची राजधानी मुंबईचा जगात सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेल्या महानगरांत समावेश झाल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र, मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रात लघु उद्योगांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उल्हासनगर शहराची घनता २०११च्या जनगणणेनुसार मुंबई शहारापेक्षा तब्बल दहा हजाराहून अधिक तर जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या ठाणे शहरापेक्षा तब्बल २४ हजाराहून अधिक आहे. मुंबईची लोकसंख्या घनता प्रति चौरस किलोमीटरला २८ हजार ४२६ आहे. तर उल्हासनगरची सुमारे ३८ हजार ९३१ इतकी प्रचंड आहे. तर ठाणे शहराची लोकसंख्या घनता १४ हजार ३६१ इतकी आहे. ठाणे शहराहून अधिक लोकसंख्येची घनता उल्हासनगर पाठोपाठ भिवंडी २६ हजार ८७१ आणि कल्याण-डोंबिवली २२ हजार २१८ यांची आहे. एमएमआरडीएनेच आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे. उल्हासनगरचे भौगोलिक क्षेत्रफळ अवघे १३ चौरस किलोमीटर असल्याने त्यांची लोकसंख्या घनता देशात कदाचित सर्वाधिक असावी.

देशातील सर्वाधिक लोकसंख्या आणि महापालिका असलेला जिल्हा म्हणून ठाणे जिल्ह्याकडे पाहिले जाते. २०११च्या जनगणणेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या एक कोटी १० लाख सहा हजार १४८ इतकी आहे. जिल्ह्यात ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, भिवंडी अशा सहा महापालिका आहेत. तर वसई-विरार नव्या पालघर जिल्ह्यात गेले आहे. राजधानी मुंबईत लोकसंख्येच्या वृद्धीचा स्थिर असला तरी २००१-२०११च्या दरम्यान मुंबईची लोकसंख्या अडीच लाखांहून कमी झालेली आहे. ती नजीकच्या ठाणे जिल्ह्यात मात्र वाढली आहे. यात ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर आणि वसईचा वेग झपाट्याने वाढत आहे. पाठोपाठ अंबरनाथ-बदलापूर, उरण-पनवेलची लोकसंख्याही वेगाने वाढत असल्याचे एमएमआरडीएने केलेल्या अभ्यासात उघड झाले आहे.

मुंबई महानगर प्रदेशाच्या शहरी विभागाची लोकसंख्येची घनता ही एकूण सकल लोकसंख्येच्या तिप्पट आहे. महानगर प्रदेशातील एकूण ८६.२६ टक्के लोकसंख्या महापालिका क्षेत्रातील आहे. त्यात मुंबईचा वाटा ५४.५६ तर उर्वरित सात महानगरपालिकांचा वाटा ३२.०७ टक्के इतका आहे. या सातपैकी ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि वसई-विरार या चार महापालिका दहा लाखांहून लोकसंख्येच्या तेव्हा होत्या. उर्वरित तीन महापालिकाही लवकरच दहा लाखांच्या होतील, असा अंदाज होता, आता कदाचित २०२१ मध्ये खरा झालेला असेल.

वाढत्या लोकसंख्येपुढे पाणीटंचाईचे संकट

महानगर प्रदेशातील शहरी भागातच आजघडीला पाण्याचा सुमारे १२४५ दशलक्ष लीटर इतका प्रचंड तुटवडा आहे. चितळे आयोगानुसार या भागात २०११ मध्ये पाण्याची मागणी ७६१० दशलक्ष लीटर एवढी होती. ती २०३४ मध्ये ११,२७९ दशलक्ष लीटरवर जाणार आहे. २०११ ते आता २०२१ पर्यंत लोकसंख्या प्रचंड वाढली असून आताच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. मात्र, त्याचा विचार न करता महाविकास आघाडी सरकारने क्लस्टर आणि एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीच्या नावाखाली चटईक्षेत्रात खैरात वाटून भविष्यातील संकटात आणखी भर घातली आहे.