शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता गेली, तर कुत्र पण विचारणार नाही", मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी फटकारलं
2
लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय?
3
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या ग्रामीण भागात 'सुपरहिट'; कमला हॅरिस यांचे प्रयत्न कमी पडल्याची चिन्हे
4
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; तुमच्याकडे कारचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर...
5
सुनीता विलियम्स यांच्यासह नासाच्या ३ अंतराळवीरांनी केलं मतदान; स्पेसमधून कसं दिलं जातं मत?
6
"आम्ही मुंब्राच काय, पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू", संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
7
सांगोल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट; ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा की शेकापला साथ?
8
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
9
IPL मेगा लिलावात उतरलाय कोच; त्याच्यावर बोली लावत CSK 'सुपर कॉम्बो'चा डाव साधणार? की...
10
Tulsi Vivah 2024 यंदा तुळशीचे लग्न कधी? ‘अशी’ सुरु झाली परंपरा; पाहा, मान्यता अन् महत्त्व
11
Bank Locker Charges : 'या' सरकारी बँकांनी वाढवले बँक लॉकर चार्जेस; आता किती द्यावे लागतील पैसे; तुमचा लॉकर आहे का?
12
मराठमोळी अभिनेत्री दीप्ती देवीचं घटस्फोटावर पहिल्यांदाच भाष्य; म्हणाली, "आजही माझं त्यांच्यावर..."
13
"ना शिवरायांनी सांगितलं, ना बाबासाहेबांनी सांगितलं, हे आत्ता सुरू झालं, कारण..."; 'संत' म्हणत राज यांचा पवारांवर हल्लाबोल
14
"माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना"; पंकजा मुंडेंच्या पराभवाचा उल्लेख, धनंजय मुंडे काय बोलले?
15
मंगलदेशा, पवित्रदेशा, नातेवाइकांच्याही देशा..., कुटुंबकबिल्याच्या विळख्यात महाराष्ट्राचं राजकारण
16
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
17
वृश्चिक संक्रांती: ७ राशींना लाभच लाभ, सरकारी नोकरीचे योग; उत्पन्नात वाढ, पैशांची बचत शक्य!
18
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'चं पहिलं पोस्टर समोर! सिनेमाचा सीक्वलही येणार, कधी प्रदर्शित होणार चित्रपट?
20
हसवता हसवता डोळ्यात पाणी आणणारी कहाणी! अभिषेक बच्चनच्या I want to Talk चा भावुक ट्रेलर

काळातलावात शिकारा, हाउस बोटीची गरज, बोटिंगला मिळतोय अल्प प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 12:45 AM

शहरातील काळातलाव व परिसराच्या सुशोभीकरणावर आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला आहे. मात्र, काळातलाव परिसरात पार्किंग व कॅफेटेरियाची सुविधा नसल्याने तलावातील बोटिंगला कमी प्रतिसाद मिळतो

कल्याण : शहरातील काळातलाव व परिसराच्या सुशोभीकरणावर आतापर्यंत कोट्यवधी रुपयांचा खर्च झाला आहे. मात्र, काळातलाव परिसरात पार्किंग व कॅफेटेरियाची सुविधा नसल्याने तलावातील बोटिंगला कमी प्रतिसाद मिळतो. केवळ शनिवार व रविवारीच बोटिंगसाठी नागरिकांची गर्दी होते. त्यामुळे त्यांचा प्रतिसाद वाढावा, यासाठी महापालिकेने सोयीसुविधा पुरवण्याची गरज व्यक्त केली जात आहे. त्याला स्थानिक शिवसेना नगरसेवक सुधीर बासरे यांनीही दुजोरा दिला आहे.पश्चिमेत ऐतिहासिक काळातलाव आहे. त्याचा परीघ सव्वा किलोमीटरचा असून खोली २० फूट आहे. या तलावात कंत्राटदार सहारा मच्छीमार संस्थेमार्फत बोटिंग खासकरून पॅडल बोट सुरू आहे. मात्र, बोटिंगला फारसा प्रतिसाद मिळत नाही. महापालिकेने तीन वर्षांसाठी ‘सहारा’ची नेमणूक केली आहे. ‘सहारा’ने वर्षाला पाच लाख रुपये उत्पन्न महापालिकेस देणे बंधनकारक आहे.काळातलाव परिसर सुशोभीकरणावर महापालिकेने यापूर्वी आठ कोटी रुपये खर्च केले आहेत. तलावानजीक शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारले असून त्यावरही किमान १० कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही बोटिंग केवळ शनिवारी, रविवारी आणि सुट्यांच्या दिवशीच सायंकाळी जास्त प्रतिसाद मिळतो. इतर दिवशी काही प्रतिसाद मिळत नाही. तलावाशेजारील झोपड्या हटवून त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या विचाराधीन आहे. झोपड्यांमुळे सध्या तेथे पार्किंगची सुविधा नाही. तसेच तलाव परिसरात कॅफेटेरिया नाही. त्यामुळे येथे तलाव परिसरात विरंगुळ्यासाठी येणाºयांना रिफ्रेशमेंटची सुविधा मिळत नाही. महापालिकेने कंत्राटदाराला तलावातील बोटिंगकरिता एक शिकारा व हाउस बोट दिल्यास बोटिंगला प्रतिसाद वाढू शकतो, असे जाणकारांचे म्हणणे आहे.बोटीचे साधे इंजीनच साडेतीन लाख रुपये किमतीचे आहे. फेरीबोटीची किंमत १२ लाख रुपये आहे. दोनआसनी पॅडल बोटीसाठी ८० हजार रुपये लागतात. तर, चारआसनी पॅडल बोटीच्या खरेदीसाठी एक लाख २० हजार रुपये खर्च येतो. ही खरेदी कंत्राटदाराला झेपणारी नाही. महापालिकेने शिकारा व हाउस बोट उपलब्ध करून दिल्यास बोटिंगचा आनंद द्विगुणीत होऊ शकतो, असे जाणकारांनी सांगितले.राज्यातील अन्य महापालिका क्षेत्रांत तलावाचे कंत्राट देताना राज्य सरकारच्या अध्यादेशाचे पालन केले जाते. या अध्यादेशानुसार, तलावात बोटिंगची सुविधा देणाºया मच्छीमार सहकारी संस्थेला किमान पाच वर्षे कंत्राट दिले जावे, संस्थेची गुंतवणूक करण्याची तयारी असल्यास त्याचा कालावधी १५ ते ३० वर्षे असावा. मच्छीमार संस्थेला रोजगार उपलब्ध करून देणे, हा सरकारचा उदात्त हेतू त्यामागे आहे. मात्र, केडीएमसीने ‘सहारा’ला तीन वर्षांचे कंत्राट दिले आहे.काळातलावात अन्य एक मच्छीमार संस्था मासेमारी करते. या तलावात रो, कटला, तेलप्पा या जातींचे मासे आहेत. मासेमारीसाठी संस्था जाळे टाकत असल्याने बोटिंगला अडथळे निर्माण होतात. त्यामुळे कोणत्याही एका संस्थेला काम द्यावे, जेणेकरून सरकारचा उद्देश साध्य होईल. महापालिका सरकारच्या अध्यादेशाला हरताळ फासण्याचे काम करते, याकडे सहारा सहकारी मच्छीमार संस्थेने लक्ष वेधले आहे. तसेच राज्यातील अन्य ठिकाणी तलावाचे काम हे प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या देखरेखीखाली दिले जाते. मात्र, केडीएमसीत हे काम बांधकाम व मालमत्ता विभागाच्या अखत्यारीत आहे.