शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Election Result 2024: एकनाथ शिंदे आज राजीनामा देण्याची शक्यता; पुढील मुख्यमंत्री कोण? चर्चांना उधाण
2
मुख्यमंत्रि‍पदावरून नाराज असल्याची चर्चा; आमदारांबाबत एकनाथ शिंदेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
3
चांगल्या कामासाठी मराठी माणसं एकत्र येणं चांगलेच; आमदार महेश सावंत यांचं विधान
4
मुख्यमंत्रि‍पदासाठी शिवसेना नेते आग्रही, पण शिंदेंचा कार्यकर्त्यांना महत्त्वाचा मेसेज; म्हणाले...
5
LIC नं सप्टेंबर तिमाहित केली ३८००० कोटींच्या शेअर्सची विक्री, तुमच्याकडे आहेत का ‘हे’ स्टॉक्स?
6
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची पिछेहाट, राज्यातील या २३ जिल्ह्यांत फोडता आला नाही भोपळा
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिकदृष्टया फायदेशीर दिवस
8
वॉरेन बफेट यांनी आपला उत्तराधिकारी ठरवला, दान केले १.१ अरब अमेरिकी डॉलरचे शेअर
9
PAN 2.0 प्रोजेक्ट काय आहे? खर्च होणार १४३५ कोटी रुपये; तुमच्या पॅन कार्डाचं काय होणार? जाणून घ्या
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: भाजप २६.७७% मतांसह राज्यात नंबर वन; मविआत मतांमध्ये कोणता पक्ष ठरला सरस?
11
भारतानं एकाच दिवसात ६४ कोटी मते मोजली; इलॉन मस्क अचंबित, अमेरिकेत अद्यापही मतमोजणी सुरूच
12
Maharashtra Assembly Election Result 2024: देवेंद्र फडणवीस, अमित शाहांची बैठक टळली; एकनाथ शिंदे-अजित पवार आज दिल्लीला जाणार
13
‘खरी शिवसेना कुणाची?’ याचा फैसला शेवटी झालाच! जे कुणाला जमलं नाही ते शिंदेंनी केलं
14
संविधान फक्त ‘नॅरेटिव्ह’पुरते?; संसद सभागृहातील गदारोळ हा अंतर्विरोध क्लेशकारक
15
आंबेडकरी विचारांची धार व धाक कुणी गमावला?; महाराष्ट्राचे, देशाचे राजकारण आता...
16
समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा महिनाभरात खुला; एमएसआरडीसीकडून कामांचा धडाका
17
साडेतीन हजार मालमत्ता होणार जप्त; कर न भरल्याने मुंबई महापालिकेची मोठी कारवाई
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीत न जाता भाजपसोबत जाणे ही चूक; राज ठाकरेंसमोर पराभूत उमेदवारांची नाराजी
19
फेअर प्ले आयपीएलप्रकरणी मुंबई, ठाण्यासह  २१९ कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त
20
निवडणूक संपताच KDMC तील २ हजार कुटुंबांचे वास्तव्य धोक्यात; सामान्य बुडाले, बिल्डर मोकाट

येऊरमधील जखमी बिबट्यावर बोरीवलीतील उद्यानात उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2020 11:48 PM

बिबट्याच्या वावराने परिसरात घबराट : वनविभागाने घेतले ताब्यात

ठाणे : येऊरच्या जंगलामध्ये दोन तासांच्या शोधमोहिमेनंतर जखमी बिबट्याला वनविभागाच्या बचाव पथकाने बुधवारी सकाळी ताब्यात घेतले. त्याला बोरीवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन्यजीव बचाव केंद्रात उपचारांसाठी हलविल्याची माहिती येऊरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार यांनी दिली.येऊर येथे लाईट हॉटेल पाठीमागील संरक्षित क्षेत्रामध्ये १५ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास हा बिबट्या आढळला होता. तो जखमी असल्याचीही माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली होती. ही माहिती मिळताच येऊर वनपरिक्षेत्रातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. झाडीत वावर असलेल्या या बिबट्याचा तोल जात होता. काही अंतर चालून तो जागीच बसत असल्याचेही वनकर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे सहायक वनसंरक्षक दिगंबर दहिबावकर, बोरीवलीतील शीघ्र बचाव पथकाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय भारब्दे आणि पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. शैलेश पेठे यांच्या पथकाला घटनास्थळी पाचारण केले होते. हे पथक येईपर्यंत रात्रीचे ९ वाजल्यामुळे काळोख पडला होता. तो पूर्णपणे शुद्धीत तसेच आक्रमक असल्याने प्रतिहल्ला करण्याचीही भीती होती. त्यामुळे रात्रीची शोधमोहीम थांबविली. त्यानंतर बुधवारी सकाळी ८ वाजता बोरीवलीचे वनपरिक्षेत्र अधिकारी विजय भारब्दे, डॉ. पेठे आणि येऊरचे वनपरिक्षेत्र अधिकारी राजेंद्र पवार आदी २० जणांच्या चमूने पुन्हा ती सुरू केली. सकाळी ९ वाजता हा आजारी बिबट्या झाडीत बसल्याचे आढळले. त्याची हालचाल यावेळी मंद होती. त्याला १०.३० वाजण्याच्या सुमारास ट्रँकोलायझन हे भुलीचे इंजेक्शन देऊन बेशुद्ध केले. प्राथमिक तपासणी करून त्याला या बचाव पथकाने ताब्यात घेतले, असे पवार म्हणाले. येऊर पूर्व येथील वनखंड क्रमांक ११४० येथे हा आजारी बिबट्या दोन तासांच्या शोधमोहिमेनंतर बुधवारी सकाळी मिळाला. त्याला ताप आलेला होता. त्याला आता बोरीवली येथील पशुवैद्यकीय रुग्णालयात दाखल केले आहे.    - राजेंद्र पवार, वनपरिक्षेत्र अधिकारी, येऊर

टॅग्स :leopardबिबट्या