शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: तावडे आलेल्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
2
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
5
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
6
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
7
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
8
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
9
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
10
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
11
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
12
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
13
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
14
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
15
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
16
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
17
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
18
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
19
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
20
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल

ठाण्यासह जिल्ह्यातील मनपांच्या पाणी पुरवठ्यासाठी काळू धरणाच्या पाठोपाठ शाई ‌‌‌‌काम- जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2021 2:43 PM

गेल्या काही दिवसांपासून पाटील ठाणे जिल्हा दौ-यावर आहेत. त्यांनी ‌‌‌‌आज सकाळपासून जिल्ह्यातील पाणी पुरवठ्यासह रखडलेल्या धरण प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतला.

ठाणे : न्याय प्रविष्ट असलेल्या काळू धरणाचे काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्या पाठोपाठ शाई धरणाचे काम लवकरच होती घेऊ. नवीन भूसंपादन कायद्यास अनुसरून शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळत आहे. त्यानुसरून शेतकऱ्यांशी संवाद साधून रखडलेले शाई व काळू धरणाचे काम पूर्ण करण्यात येईल, असे जलसंपादा मंत्री जयंत पाटील, यांनी स्पष्ट केले. यामुळे ठाणे शहरासह जिल्ह्यातील महापालिकांच्या पाण्याची समस्या कारमची दूर होणार असल्याचे त्यांनी सांगितले.              

गेल्या काही दिवसांपासून पाटील ठाणे जिल्हा दौ-यावर आहेत. त्यांनी ‌‌‌‌आज सकाळपासून जिल्ह्यातील पाणी पुरवठ्यासह रखडलेल्या धरण प्रकल्पांच्या कामाचा आढावा घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधून पाणी समस्या सोडवण्याच्या विविध उपाययोजना स्पष्ट केल्या. त्यात काही वर्षांपासून रखडलेल्या शाई व काळू धरणांचे कामे लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नगरविकास मंत्री व ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र ‌आव्हाड, यांच्या ग्वाहीसह स्पष्ट केले. जिल्ह्यातील अनेक शहरांना दोन ते तीन. दिवसांनी पाणीपुरवठा होतो आहे. त्यामुळे या पाणी पुरवठ्यामुळे काही प्रश्न तयार झाले आहेत. काही ठिकाणी कमी पाणी ‌कमी मिळत आहे. यासाठी तातडीने उपाययोजना करून सध्याच्या प्रकल्पातून किती पाणी पुरवठा होणार आणि अतिरिक्त पाण्यासाठी काय करावे ‌लागणार आदी विषयांवर आढावा बैटकीत चर्चा झाल्याचे पाटील यांनी सांगितले. या पाणी पुरवठ्यासाठी पाणी पुरवठा विभागाचे सचिवांनी चर्चा करून तोडगा काढणार असल्याचे ही त्यांनी सांगितले.           

जिल्ह्यातील रखडलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागतो. यासह जिल्ह्यातील पाणी पुरवठ्याच्या तुटफूट होणार्रा पाईप लाईनचे कामं करण्यासाठी काही ठिकाणी विरोध होतो. त्यास आळा घालण्यासाठी व पाईट लाईन वेळीच जोडण्यासाठी पोलीस यंत्रणा तैनात करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले आणि या विविध कामांना मार्गी लावण्यासाठी त्यांचा दैनंदिन आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स गठीत करण्यात येत आहे. त्यास पालकमंत्री एकनाथ शिंदे, यांनीही सहमती दिल्याचे पाटील यांनी सांगितले.                         

येऊर येथील जुना बंधार्याची दुरुस्ती करून त्यातील वाहून जाणार्या पाण्याचा वापर ‌ठाणे शहराच्या काही भागाला होईल. येथील जून्या बंधार्याचे पाणी खालील गळतीने वाहून जाते. त्यामुळे या धरणाच्या दुरुस्ती च्या सूचना दिलेले आहेत, असे पाटील म्हणाले. मुंब्रा परिसरातील डोगरातील वाहून जाणारे पाणी कोल्हापूरी बंधारे बांधावून आडवता येईल. या पाण्याचा वापर कळवा आणि मुंब्रा या प्रभागांमध्ये करून पाणी समस्या कमी करता येईल.व,असेही त्यांनी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मागणीस अनुसरुन सांगितले.  

MIDC ला आता एसटीपी प्लंनचे पाणी          जिल्ह्यातील महानगरपालिकांना पाण्याच्या रियासकलींच्या प्रकल्पांची क्षमता वाढण्यास सांगितले. याशिवाय रिसायकल पाणी एमआयडीसीला वापर करण्यास भाग पाडले जाणार आहे. यांना पिण्याच्या पाण्याचा वापर करण्यास मनाई करावी लागणार आहे. एम आयडीसीला त्यांचे वाहून जाणारे पाणी एसटीपी प्लँनचा‌ वापर करून रिसायकलींग पाणी ‌व वापरणे बंधनकारक केले जाईल. यामुळे त्यांच्याकडून वापरण्यात येणाऱ्या पिण्याच्या पाण्याचा वापर ठिकठिकाणी असलेली पाणी समस्या दूर करण्यासाठी करता येईल, असे पालकमंत्री एकनाथ शिंदे, यांनी सुचवलेल्या उपाययोजनेला दुजोरा ‌देत पाटील यांनी स्पष्ट केले.जुने व नवे  प्रकल्प लवकर पूर्ण करणे गरजेचे झाले आहे. आता मधल्या काळामध्ये कोकणामध्ये अतिवृष्टी झाल्यानंतर मंत्रिमंडळात मुख्यमंत्री महोदयांनी देखील सूतोवाच केले आणि सगळ्यात मोठे प्रकल्प तातडीने, वेगाने पूर्ण करावे, असे नमूद केल्याचे पाटील यांनी पत्रकारांना सांगितले.

टॅग्स :WaterपाणीJayant Patilजयंत पाटील