शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
2
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
3
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
5
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
6
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
8
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
9
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
10
तणाव वाढला! मणिपूरमध्ये ‘एनपीपी’ने काढला सरकारचा पाठिंबा; काँग्रेस आमदारांची राजीनाम्याची तयारी
11
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
12
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
13
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
14
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
15
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
16
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
17
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
18
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
19
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
20
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात

ठाणे पोलिसांचा अभिनव उपक्रम : प्रथमच केला पोर्टेबल लायटिंग टॉवरचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2017 1:57 AM

मुंब्य्रासारख्या भागातील रेतीबंदर घाट परिसरात देवी विसर्जन करणा-या भाविकांसाठी तसेच मोहरमच्या मिरवणुकीच्या वेळी गर्द अंधारामुळे कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी राज्यात प्रथमच ठाणे पोलिसांनी ‘पोर्टेबल इन्फ्लेटेबल लायटिंग टॉवर’चा वापर केला.

ठाणे : मुंब्य्रासारख्या भागातील रेतीबंदर घाट परिसरात देवी विसर्जन करणाºया भाविकांसाठी तसेच मोहरमच्या मिरवणुकीच्या वेळी गर्द अंधारामुळे कोणताही गैरप्रकार होऊ नये, यासाठी राज्यात प्रथमच ठाणे पोलिसांनी ‘पोर्टेबल इन्फ्लेटेबल लायटिंग टॉवर’चा वापर केला. यामुळे मिरवणुकीतील बंदोबस्ताबरोबरच काळ्याकुट्ट अंधारात भाविकांना लख्ख प्रकाशाची सुविधा देण्याचा अनोखा उपक्रम पोलिसांनी राबवल्याची माहिती ठाण्याचे पोलीस उपायुक्त डॉ. डी.एस. स्वामी यांनी दिली.दसºयाच्या दिवशी ३० सप्टेंबर रोजी ठाण्यात सार्वजनिक ११७ देवीच्या मूर्ती, आठ प्रतिमा, दोन घट तर खासगी १९४ मूर्ती, १२ प्रतिमा आणि ५२७ घट अशा ३११ मूर्ती, २० प्रतिमा आणि ५२९ घटांचे शहरातील वेगवेगळे तलाव आणि खाडी परिसरात विसर्जन करण्यात आले. १ आॅक्टोबर रोजी मुंब्रा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात मोहरमनिमित्ताने २७ सार्वजनिक पंजे आणि सहा ताबूत तसेच २६० पंजे, १२ प्रतिमा आणि नऊ ताबूत असे २८७ पंजे, १२ ताजिया, १५ ताबूत अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात मिरवणुका काढल्या होत्या.कळवा रेतीबंदर घाट परिसरात देवी विसर्जन मिरवणुका येत असताना तसेच मोहरमनिमित्ताने काढलेल्या मिरवणुका रेतीबंदर मुंब्रा येथे विसर्जनासाठी येत असताना अपुºया प्रकाशव्यवस्थेमुळे मिरवणुकीतील सामान्य नागरिक तसेच बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनाही समोरील दृश्य दिसणे अवघड जात होते. त्यामुळेच अशा मिरवणुकांवर नियंत्रण ठेवणेही पोलिसांना आव्हानात्मक होते.यंदा हीच समस्या पुन्हा उद्भवू नये, यासाठी त्यांच्यादरम्यान पोर्टेबल इन्फ्लेटेबल लायटिंग टॉवरचा विशेष वापर मुंब्रा आणि कळवा पोलिसांनी केला.रात्रीच्या वेळी प्रखर प्रकाशासाठी एका ठिकाणाहून दुसºया ठिकाणी सहज नेता येईल, अशा आधुनिक तंत्रज्ञानाच्या या टॉवरचा उपयोग करण्यासाठी पोलीस आयुक्त परमवीर सिंग, सहपोलीस आयुक्त मधुकर पांडेय, पश्चिम प्रादेशिक विभागाचे अतिरिक्त पोलीस आयुक्त सत्यनारायण चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली या मिरवणुकांच्या वेळी कळवा आणि मुंब्रा भागांत उत्कृष्टरीत्या वापर करण्यात आला. त्यामुळे मोहरमच्या मिरवणुकाही कोणत्याही अडथळ्याविना पार पडल्याची माहिती स्वामी यांनी दिली. या वेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांनाही या अनोख्या सुविधेचा चांगल्या प्रकारे उपयोग झाल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :thaneठाणे