लोकमत न्यूज नेटवर्कवसई : बॅसीन कॅथॉलिक बँकेने सातिवली येथे खरेदी केलेल्या गाळ््याच्या व्यवहाराच्या चौकशीसाठी चाचणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश सहकार आयुक्तांनी दिले आहेत. त्यासाठी मुंबईच्या अपर विशेष लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांना एका महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.बॅसीन कॅथॉलिक बँकेने सातीवली शाखेसाठी घेतलेल्या जागेसंदर्भात बँकेचे आर्थिक नुकसान झाल्याची तक्रार अॅड. जिमी घोन्सालवीस यांनी पुण्याचे सहकार आयुक्त डॉ. जे. डी. पाटील यांच्याकडे केली आहे. घोन्सालवीस यांच्या तक्रारीनंतर नागरी बँक कार्यासनाने या बँकेचे चाचणी लेखापरीक्षण करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० चे कल ८१ (३) (क) अन्वये चाचणी लेखापरिक्षण करणे आवश्यक असल्याचे मत पाटील यांनी नोंदवले आहे. बँकेच्या परिशिष्ट अ मध्ये निर्धारित केलेल्या मुद्यांचे चाचणी लेखापरीक्षण करण्यासाठी अपर विशेष लेखापरिक्षक एस. एस. सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या बँकेच्या परिशिष्ट अ मधील मुद्यांना अनुसरून बँकेच्या निधीचा दुरुपयोग, गैरव्यवहार, अपहार व तदअनुषंगाने बँकेचे आर्थिक नुकसान झाले किंवा कसे याबाबत चाचणी लेखापरीक्षण करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल एक महिन्याच्या आत सादर करावा, असे निर्देश पाटील यांनी दिले आहेत.
कॅथॉलिकच्या गाळाखरेदीची चौकशी
By admin | Published: May 24, 2017 12:55 AM