ठाणे : यंदाच्या खरीप हंगामातील दर्जेदार भात शेतीच्या पाहणीसह जिल्ह्यातील यांत्रिकीकरणाव्दारे होणारी शेती, कृषी योजनांचा लाभ घेतलेल्या शेतकºयांच्या शेतीची प्रत्यक्ष पाहाणी आणि यंत्राव्दारे भात कापणीचे प्रात्यक्षिक नवी दिल्ली येथील केंद्र शासनाच्या कृषि व शेतकरी कल्याण विभागाचे संचालक राजेश जैस्वाल, उपसचिव अनिल गुप्ता, यांनी ठाणे जिल्ह्याच्या दौºयाप्रसंगी आज केले, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दिपक कुटे यांनी सांगितले.
जिल्ह्याभरातील ग्रामीण, दुर्गम व आदिवासी परिसरातील शेतकºयांपर्यंत केंद्र शासनाच्या आलेल्या योजनांचा लाभ घेतलेल्या शेतकºयाची जैस्वाल, गुप्ता यांनी भेट घेऊन त्यांचे अनुभव व समस्या ऐकूण घेतल्या. शहापूर तालुक्याती सापगांव परिसरातील शेतीची पाहाणी या केंद्र शासनाच्या अधिकाºयांनी केली. भात कापणी यंत्राद्वारे पिक कापणीचे प्रात्यक्षिक घेतले. कृषि यांत्रिकीकरणच्या यंत्राची पाहणी, योजनाच्या लाभार्थी शेतकºयांशी संवाद साधून या अधिकाºयांनी चर्चा केली. यावेळी यावेळी रामदास शिवराम तरणे यांच्या प्रक्षेत्रावरील भाताची कापणी यंत्राद्वारे आज करण्यात आली. या पाहाणी दौºयाप्रसंगी जिल्हा परिषदेच्या सभापती वंदना भांडे, कृषीचे विभागीय नोडल अधिकारी रामेश्वर पाचे, परिसरातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, प्रगतीशील शेतकरी, यांत्रिकीकरण लाभार्थी आणि कृषिचे अधिकारी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.