उल्हासनगर: महापालिकेने बाप्पाच्या विसर्जनासाठी ५ ठिकाणी कुत्रीम तलावाची उभारणी करून आयडिआय कंपनी जवळील उल्हास नदी किनारी मोठ्या मूर्त्यांसाठी विसर्जन घाट बांधण्यात आला. आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, सहायक आयुक्त गणेश शिंपी आदींनी सोमवारी कृत्रिम तलाव व विसर्जन घाटाची पाहणी केली.
उल्हासनगरातील गणेश मूर्तीचे विसर्जनासाठी महापालिकेने, कैलास कॉलनी, हिराघाट, रेल्वे स्टेशन जवळ, गोल मैदान, आयडिआय कंपनी आदी ठिकाणी कृत्रिम तलाव उभारले आहे. विसर्जन ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेऱ्याची नजर राहणार असून पोलीस व महापालिका कर्मचारी याठिकाणी तैनात असणार आहेत. तसेच नारळ व निर्मल्य एका ठिकाणी जमा करून हिराघाट येथे निर्मल्यावर प्रक्रिया करून खत करण्यात येणार असल्याची माहिती वैधकीय अधिकारी मनीष हिवरे यांनी दिली. आयुक्त अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, सहायक आयुक्त गणेश शिंपी आदींनी कृत्रिम तलाव व विसर्जन घाटाची पाहणी करून अधिकाऱ्यांना कामा बाबत सूचना केल्या आहेत.
महापालिकेने आयडिआय कंपनी जवळ उल्हास नदी किनारी विसर्जन घाट बांधला असून याठिकाणी बाप्पाच्या उंच मूर्तीचे विसर्जन होणार असल्याचे सांगण्यात आले. शहरातील सार्वजनिक मंडळाच्या उंच मूर्तीला प्राधान्य दिले जाणार असून कल्याण व मुंबई आदी ठिकाणी बाप्पाचे विसर्जन न करता त्याऐवजी उल्हास नदीच्या विसर्जन करण्याचे आवाहनही आयुक्तांनी केले.
नागरिक व गणेश मंडळासाठी विसर्जन ठिकाणी लायटिंग, मंडप व महापालिका कर्मचारी सेवेत दाखल असणार आहेत. तसेच सर्वच विसर्जन ठिकाणाहून निर्माल्य एकत्र करून त्यावर हिराघाट येथे प्रक्रिया केली जाणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. सार्वजनिक गणेश मंडळासह नागरिकांनी महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहनही आयुक्त अजीज शेख यांनी केले आहे.