ठाणे : शहरात बाहेरून येणारी वाहने त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी ठाणेकरांना त्रासदायक होत होती यातून सुटका मिळावी व हि वाहने शहराबाहेर काढता यावी यासाठी शहरातील अंतर्गत वाहतूककोंडी कमी करण्यासाठी खासदार राजन विचारें यांनी आज शहरात सुरु असलेल्या उड्डाणपूलाच्या कामाची पाहणी महापालिका तसेच एम एम आर डी ए अधिकाऱ्यांसह करण्यात आली त्यावेळी खासदार राजन विचारे, ठा म पा सभागृह नेते नरेश म्हस्के, ठाणे महापालिकेचे नगरअभियंता अनिल पाटील, कार्यकारी अभियंता पापळकर, एम एम आर डी ए चे कार्यकारी अभियंता विनय सुर्वे, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त गीते, एन सी सी जयकुमार- एस एम सी या कंपनीचे इंजिनियर, नगरसेवक सुधीर कोकाटे, मा. नगरसेवक हिराकांत फर्डे, विभाग प्रमुख दीपक म्हस्के, व इतर पदाधिकारी व अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या पाहणी दौऱ्यात या प्रकल्पाच्या कार्यालयात बसून या कामाला का विलंब लागला याची चर्चा करून त्याची खातरजमा करण्यासाठी प्रत्यक्ष जागेवर जाऊन या तिन्ही उड्डाण पुलाची पाहणी केली. या उड्डाणपूलाच्या कामाला सन २०१४ ला मंजुरी मिळाली असून याला एम एम आर डी ए कडून २२३ कोटीचे अर्थ सहाय्य प्राप्त झाले होते व याचे काम महापालिकेमार्फत सुरु करण्यात आले होते.
मीनाताई ठाकरे चौक -- त्यामध्ये मीनाताई ठाकरे चौकामधून जाणाऱ्या उड्डाण पुलाच्या आराखड्यात बदल करून हे सलग पूल दोन दिशेस वर्गीकरण केले १ एलबीएस मार्गावर ६८३ मी. चा उड्डाणपूल व २ केविल्ला (हॉली क्रॉस) मार्गावर ५८९ मी. चा उड्डाणपूल असे एकूण १३७२ मी. चा उड्डाणपूल करण्यात आला. जेणेकरून पूर्वी असलेल्या आराखड्यात हे पिलर मध्ये घेतले असते तर चौकामध्ये वाहतूक कोंडी निर्माण झाली असती. त्यामुळे या पुलाच्या पायाच्या संकल्प चित्रामध्ये आवश्यक फेरबदल करून पुलाच्या पायांचे काम दोन्ही दिशेस करण्यात आले. तसेच हा पूल ३१ मे पर्यंत सुरु करण्यात येणार आहे .
अल्मेडा चौक - हा पूल ६३६ मीटरचा असणार आहे या उड्डाणपुलाच्या कामात वंदना डेपो जवळ येथे अप – डाऊन असणाऱ्या ठिकाणी महापलिका विकास आराखड्यामध्ये (dp plan)असणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम तात्काळ सुरु करावे असे आदेश नगर अभियंता यांना देण्यात आले तसेच हा पूल ३१ मार्च पर्यंत सुरु करण्यात येणार आहे
संत नामदेव चौक - हा पूल ६४७ मीटर लांबीचा असून याठिकाणी सुद्धा ठिकाणी महापलिका विकास आराखड्यामध्ये (dp plan)असणाऱ्या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम तात्काळ सुरु करून तसेच पदपथ आत घेऊन रस्ता रुंद करावा व पदपथाचे नूतनीकरण करून घ्यावेत असे आदेश नगर अभियंता यांना देण्यात आले तसेच हा पूल ३० एप्रिल पर्यंत सुरु करण्यात येणार आहे
हे तिन्ही उड्डाणपूल टप्यानुसार सुरु करण्यात येणार आहे तसेच या उड्डाणपुलाच्या कामात असे निदर्शनास आले की या प्रकल्पामध्ये भूमिगत जलवाहिनी , महावितरणाच्या उच्च्य दाबाच्या वाहिनी, मलवाहिनी यांचे मोठ्या प्रमाणात स्थलांतरित करावे लागले व काही ठिकाणी स्थलांतरित करणे शक्य नसल्याने त्यामध्ये या पुलाच्या पायाच्या संकल्प चित्रामध्ये आवश्यक फेरबदल करून पुलाच्या पायांचे काम करण्यात आले असल्याने यास विलंब लागल्याचे निदर्शनास आले आहे
---------------------------------------------------------------------------
कोपरी पुलाचे काम येत्या १५ दिवसात सुरु होणार – विचारे
या पाहणी दौऱ्यात उपस्थित असलेल्या एम एम आर डी ए च्या अधिकाऱ्यांना खासदार राजन विचारे यांनी विचारणा केली असता या पुलाच्या निविदा आजच उघडण्यात येणार आहे सादर झालेल्या निविदांच्या कागदपत्राची निवेदांच्या अटी शर्ती नुसार सर्व बाबी तपासून योग्य पात्र असणाऱ्यास ठेकेदारास कार्यादेश देण्यात येणार आहे याप्रक्रियेस १५ दिवस लागणार असल्याची माहिती अधिकाऱ्याकडून खा.विचारे यांना देण्यात आली आहे .
फायदा - शहरातील तिन्ही उड्डाणपूल टप्यानुसार सुरु करण्यात येणार आहे तसेच कोपरी पुलाचे काम सुरु झाल्यास या कोपरी पुलावरून ये-जा करणारी वाहने काही प्रमाणात कॅसलमिल मार्गे या शहरातील तिन्ही उड्डाणपूलवरून ठाणे कोपरी पुलाद्वारे सर्विस रोड मार्गे हायवे पूर्व द्रुतगती मार्गाला जोडण्यात येणार आहे.