सदानंद नाईक, उल्हासनगर : महापालिका आयुक्त अजीज शेख यांनी गुढीपाडव्याच्या सुट्टीच्या अधिकाऱ्या सोबत विकास कामाची पाहणी करून १५ दिवसात त्याबाबतचा अहवाल मागितला. आयुक्तांच्या टार्गेटवर विकास कामे आल्याने, ठेकेदारांची धाबे दणाणले असून आयुक्त काय कारवाई करतात. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उल्हासनगरात विकास कामाबाबत गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून रस्ते खोदतांना महापालिकेची परवानगी घेतली जाते का? असा प्रश्न विचारला जातो. त्यानंतर परवानगी विना रस्ते खोदू नका. असा आदेश आयुक्तांना काढावा लागला आहे. पावसाळ्यापूर्वी खोदलेले रस्ते दुरुस्ती करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले असून रस्ते खोदल्याने शहरात धुळीचे साम्राज्य निर्माण झाले. दरम्यान लोकसभा निवडणुक कामासाठी बहुतांश कर्मचारी वर्ग गेला असून तुटपुंज्या मनुष्यळावर कामे करण्याची वेळ महापालिकेवर आली. महापालिका आयुक्त अजित शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, बांधकाम विभागाचे संदीप जाधव, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता परमेश्वर बुडगे, दिपक ढोले, सहाय्यक संचालक नगररचना ललित खोब्रागडे व सार्वजनिक आरोग्य अधिकारी मनीष हिवरे यांच्यासह संबंधित कामाचे कंत्राटदार व सल्लागार यांनी कामाची पाहणी केली.
शहरातील भुयारी गटार योजने अंतर्गत महापालिका परवानगी विना रस्ते खोदून गटारीचे पाईप टाकले जात असल्याने, शहरात धुळीचे प्रमाण वाढले आहे. वाढलेले धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जास्तीचे मनुष्यबळ लावून स्वच्छता मोहीम हाती घेऊन डीप क्लिनिंग कार्यक्रम अंतर्गत विशेष स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली आहे. गुडीपाडवा, चेटीचंड यात्रा, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त बाईक रॅली, चेटीचंड यात्रा मार्ग, मिरवणूक मार्गाची दुरुस्ती महापालिकेने सुरू केली.