दोन लाख गणरायांची प्रतिष्ठापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 03:28 AM2018-09-13T03:28:13+5:302018-09-13T03:28:23+5:30

लाडक्या गणरायाच्या प्रतिष्ठापनेला आता अवघे काही तास शिल्लक असून, भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.

Installation of two lakhs | दोन लाख गणरायांची प्रतिष्ठापना

दोन लाख गणरायांची प्रतिष्ठापना

Next

ठाणे : लाडक्या गणरायाच्या प्रतिष्ठापनेला आता अवघे काही तास शिल्लक असून, भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. पोलीस आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्रात यंदा एक लाख ४० हजार ४४४ खासगी, तर एक हजार ७१ सार्वजनिक आणि ग्रामीण भागात ४० हजार खासगी, तर सुमारे १० हजार सार्वजनिक श्रींच्या मूर्तींची प्रतिष्ठापना होणार आहे. त्यासाठी जिल्हाभर शीघ्रकृती दलासह कडेकोट पोलीस बंदोबस्तही तैनात ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ठाणे पोलिसांच्या पाचही परिमंडळांपैकी कल्याणमध्ये सर्वाधिक म्हणजे २९१ सार्वजनिक गणेशांची प्रतिष्ठापना होणार आहे. कल्यााण शहरामध्ये ४४,१०० खासगी गणरायांची प्रतिष्ठापना होईल. उल्हासनगरमध्ये सार्वजनिक २८९ (खासगी-४१ हजार ८६१), वागळे इस्टेटमध्ये १९८ (खासगी २५ हजार ११४), भिवंडीत १५७ सार्वजनिक, तर ठाणे शहरामध्ये १३६ सार्वजनिक १९ हजार ५६९ खासगी गणरायांची प्रतिष्ठापना होईल. गेल्या वर्षीच्या तुलनेत सार्वजनिक मंडळांची संख्या नऊने घटली आहे. तर, घरगुती गणपतींमध्ये २५६ ची भर पडली आहे. गेल्या वर्षी संपूर्ण आयुक्तालय क्षेत्रात एक लाख ४० हजार ७०० इतक्या घरगुती गणरायांची प्रतिष्ठापना झाली होती. ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक यांच्या कार्यक्षेत्रातील मीरा रोड, भार्इंदर, मुरबाड, शहापूर आणि गणेशपुरी या पाचही उपविभागांमध्ये खासगी ४० हजार, तर सार्वजनिक १० हजार श्रींची प्रतिष्ठापना होणार आहे.
>सीसी कॅमेऱ्यांची नजर
गणरायाच्या आगमनानंतर पोलिसांसह मंडळाचे कार्यकर्ते अहोरात्र आपल्या गणरायाची काळजी घेणार आहेत. यासाठी मंडपांच्या ठिकाणी सीसी कॅमेºयांद्वारेही निगराणी ठेवली जाणार आहे. ठाणे, भिवंडी, कल्याण आणि उल्हासनगर या आयुक्तालय कार्यक्षेत्रात सुमारे साडेचार हजार पोलीस अधिकारी कर्मचारी बंदोबस्तासाठी आहेत.
याशिवाय, एका कंपनीत ९० कर्मचारी असलेल्या राज्य राखीव दलाच्या पाच कंपन्या, शीघ्रकृती दलाची एक कंपनी तसेच गृहरक्षक दलाचे ४५० जवान तैनात ठेवल्याची माहिती सूत्रांनी दिली.
ग्रामीण भागात यंदा द्रोण आणि सीसीटीव्हींद्वारेही नजर ठेवली जाणार आहे. याशिवाय, एक हजार ६०० अधिकारी कर्मचारी, राज्य राखीव दलाची एक कंपनी आणि २५० गृहरक्षक दलाचे जवान बंदोबस्तासाठी सज्ज असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठोड यांनी सांगितले. धार्मिक पावित्र्य ठेवून उत्सव साजरा करण्याचे मंडळांना आवाहन केल्याचेही राठोड म्हणाले.
>कल्याण-डोंबिवलीत २७९ सार्वजनिक गणेशस्थापना
गणरायाच्या स्वागतासाठी कल्याण-डोंबिवली शहरे सज्ज झाली असून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवू नये, म्हणून पोलीस प्रशासनदेखील सज्ज आहे. ठिकठिकाणी सजलेले मंडप आणि विद्युत रोषणाईमुळे वातावरण मंगलमय झाले आहे. कल्याण-डोंबिवली शहरांतील आठ पोलीस ठाण्यांच्या हद्दीत घरगुती ४१ हजार ८२९ आणि २७९ सार्वजनिक गणेशाची स्थापना होणार आहे. गणेशोत्सव उत्साहात पार पडावा, यासाठी सर्व पोलीस ठाण्यांतील अधिकाºयांची फौज तयार असून त्यांच्या मदतीला १५६ पोलीस कर्मचारी बाहेरून आले आहेत. याशिवाय, राज्य राखीव दलाच्या दोन तुकड्याही सज्ज आहेत. उत्सवाच्या काळात दिवसरात्र पोलिसांची गस्त सुरू राहणार आहे. विसर्जन सोहळ्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त असून प्रत्येक मिरवणुकीवर पोलिसांची नजर असणार आहे.गणेशोत्सव उत्साहात, आनंदात आणि शांततेत पार पडावा, यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे. सोबतच नागरिकांनीही या काळात सजग राहण्याची गरज आहे. कुठेही बेवारस किंवा संशयित वस्तू किंवा व्यक्ती आढळल्यास याबाबतची माहिती जवळच्या पोलीस ठाण्यास तत्काळ द्यावी.
- दत्तात्रेय कांबळे, कल्याण, सहायक पोलीस आयुक्त)

Web Title: Installation of two lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.