शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय वादांचे बॉम्ब, निवडणुकीच्या प्रचारात आरोप-प्रत्यारोपांचे फटाके, नवनवीन मुद्दे आणि वादग्रस्त वक्तव्यांची मालिका
2
Susie Wiles : कोण आहेत सूझी विल्स? ज्यांना डोनाल्ड ट्रम्प यांनी बनवलं व्हाईट हाऊसच्या चीफ ऑफ स्टाफ
3
निवडणुकीत अल्पसंख्याक मतदारांची भूमिका महत्त्वाची, राज्यातील ३५ जागांवर ठरणार निर्णायक
4
US Fed Rate Cut : अमेरिकेत पुन्हा व्याजदरात कपात; फेडनं ०.२५ टक्के कमी केला रेट, शेअर बाजारावर काय परिणाम होणार?
5
आजचे राशीभविष्य, ८ नोव्हेंबर २०२४ : प्रिय व्यक्तीचा सहवास घडेल, खर्चाचे प्रमाण वाढेल
6
कांदा ८०, लसूण ५०० रुपये किलो! निवडणुकीच्या तोंडावर दरवाढ, सर्वपक्षीय उमेदवारांना टेन्शन
7
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
8
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
9
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
10
उद्धव ठाकरे यांची पंचसूत्री नव्हे तर थापासुत्री, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका
11
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
12
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
13
महाराष्ट्र को लुटेंगे, दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडा, उद्धव ठाकरे यांचा घणाघात; सामान्य जनभावना या सरकारविरोधात
14
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
15
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
16
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
17
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
19
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
20
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'

पाणी साचले तर दोरखंड धरण्याची सूचना; मात्र त्या दोरखंडाचा पत्याच नाही

By अजित मांडके | Published: July 02, 2024 3:24 PM

पावसाळा सुरु झाला की महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी शहरात पाणी तुंबणाºया ठिकाणांची यादी जाहीर केली जाते.

ठाणे :  ठाणे महापालिका हद्दीत यंदा ३३ ठिकाणी पाणी साचणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे. त्यानुसार त्याची यादी देखील जाहीर केली आहे. तसेच जी महत्वाची १४ ठिकाणे आहेत, ज्याठिकाणी अधिक स्वरुपात पाणी तुंबते अशा ठिकाणी महापालिकेने फलक लावले असून काय काय काळजी घ्यावी याची माहिती त्यावर दिली आहे. परंतु त्यातील शेवटची ओळ खुप महत्वाची असून अधिकचे पाणी साचल्यास नजीकच्या दोरखंडाचा वापर करुन मार्गक्रमण करावे असे त्यावर लिहिले आहे. मात्र दोरखंडाचा त्याठिकाणी पत्ताच नसल्याचे प्रत्यक्षात दिसत आहे.

पावसाळा सुरु झाला की महापालिकेच्या माध्यमातून दरवर्षी शहरात पाणी तुंबणाºया ठिकाणांची यादी जाहीर केली जाते. त्यानुसार मागील वर्षी पर्यंत ही ठिकाणे केवळ १४ एवढीच होती. परंतु यंदा मात्र त्यात वाढ होऊन ही संख्या ३३ वर गेली आहे. त्यानुसार प्रभाग समिति निहाय विचार करता सर्वधिक पाणी साठण्याची ठिकाणे दिवा प्रभाग समितीच्या हद्दीत १६ आहेत. तर त्यापाठोपाठ नोपाडा -कोपरी -८  उथळसर -०३, माजिवडा-मानपाडा -०४ कळवा -०२ आदिचा समावेश आहे.  

त्यातील  राम मारुती रोड, गोखले रोड, राम गणेश गडकरी रंगायतन, सॅटीस पुलाखालील  मासुंदा तलाव  वंदना टॉकीज ,गायमुख हायवे ,विटावा रेल्वे पूला खाली,शिवाजी नगर, दादलानी पार्क, पेढ्या मारुती रोड, साबे गाव, डायघर, डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह चौक, चव्हाण चाळ, वृदांवन आणि श्रीरंग सोसायटी, पंचामृत, आयसीआयसीआय बँक घोडबंदर रोड,  आदी काही ठिकाणे ही महत्वाची पाणी तुंबणारी ठिकाणे असल्याचे महापालिकेने सांगितले आहे. त्यानुसार पावसाळ्यात ज्या ज्या ठिकाणी पाणी तुंबणार आहे, त्याठिकाणी महापालिकेने फलक लावले आहेत. या फलकावर धोक्याची सुचना असे लिहिण्यात आले आहे. त्या खाली अतिवृष्टीच्या काळात सदर ठिकाणी पाणी तुंबण्याची शक्यता आहे. कृपया सदर ठिकाणी येण्याचे टाळावे किंवा नजीकच्या दोरखंडाचा वापर करुन मार्गक्रमण करावे असे देखील लिहिले आहे.परंतु सध्या तरी येथील कोणत्याही ठिकाणी दोरखंडाची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली नाही. त्यामुळे एखाद्या वेळेस मोठा पाऊस झालाच आणि या ठिकाणांवर पाणी साचले तर नजीकच्या कोणत्या ठिकाणी दोरखंड शोधायचा असा सवाल या निमित्ताने ठाणेकरांनी उपस्थित केला आहे.

टॅग्स :thaneठाणेRainपाऊस