- लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : विनयभंग करून अॅसिड टाकून मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नितीन सिंग आणि सचिन सिंग या दोघा भावांविरुद्ध वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.सासरी त्रास होत असल्यामुळे २८ वर्षीय विवाहिता ही वागळे इस्टेट येथील लुईसवाडीतील आपल्या माहेरी वास्तव्याला आली. ती ६ मे २०१७ रोजी दुपारी २.३० वा.च्या सुमारास वागळे इस्टेट येथील रोड क्रमांक १६ येथून जात असताना तिचे दीर नितीन (२९)आणि सचिन (२५) यांनी तिचा पाठलाग केला. ती रस्ता ओलांडत असतानाच सचिन याने तिच्या हातातील बॅग खेचली.
अॅसिड टाकण्याची दिराची धमकी
By admin | Published: May 18, 2017 12:10 AM