जितेंद्र कालेकर महाराष्ट्र पोलीस दलाच्या आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत ठाणे शहर वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात स्पीडगन कॅमेऱ्यासह सुसज्ज इंटरसेप्टर व्हेइकल या दोन अत्याधुनिक वाहनांचा समावेश करण्यात आला आहे. याबाबत, ठाणे शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपायुक्त अमित काळे यांच्याशी साधलेला संवाद...ठाणे पोलिसांच्या ताफ्यात नव्याने समावेश झालेल्या इंटरसेप्टर व्हेइकल स्पीडगन विथ कॅमेºयाची काय वैशिष्ट्ये आहेत?या अत्याधुनिक वाहनांच्या स्पीडगनद्वारे रोडवर लेझरचा पॉइंट निघतो. त्याच पॉइंटच्या आधाराने भन्नाट वेगाने वाहन चालविणारे, सीटबेल्ट न लावणारे, मोबाइलवर बोलत वाहन चालविणाऱ्यांना याद्वारे अचूक टिपले जाणार आहे. वाहन क्रमांकाच्या आधारे सर्व्हरद्वारे त्याची आरटीओकडे असलेल्या माहितीच्या आधारे वाहतुकीचे नियम तोडणाºया संबंधिताच्या मोबाइलवर अवघ्या पाच मिनिटांमध्येच ई-चलनाच्या कारवाईचा संदेश पाठविला जाणार आहे.या वाहनांमुळे गुन्ह्यांचे प्रमाण कसे कमी होईल?सर्वात महत्त्वाचे म्हणजे वाहतुकीचे नियम तोडणाºयांविरुद्ध कोणताही वाद होणार नाही. पुराव्यासहित ई-चलनाद्वारे जादा वेगावर, फोनवर बोलणाºयांवर कारवाई झाल्याने अशा गुन्ह्यांचे प्रमाणही कमी होईल. पर्यायाने, अपघातांचे प्रमाणही नियंत्रणात येईल.ठाण्यात कोणत्या ठिकाणी या वाहनांद्वारे कारवाई केली जाईल?घोडबंदर रोड, खारेगाव, मुंब्रा बायपास, भिवंडीतील रांजनोली, पिंपळासफाटा, शीळफाटा, कल्याणफाटा आदी ठिकाणांवर ही वाहने उभी केली जाणार आहेत. वेगाने आणि वाहन चालविणारे मद्यपी याठिकाणी अधिक असून, त्यांच्यावर लक्ष ठेवले जाणार आहे.।इंटरसेप्टर व्हेइकलचा आणखी काय फायदा होणार आहे?या वाहनांमध्ये ब्रिथ अॅनालायझरची यंत्रणाही बसविलेली असून एखाद्या मद्यपी वाहनचालकाला थांबवून फोटोसह त्याने किती प्रमाणात मद्य प्राशन केले, याचा अहवालही तत्काळ मिळणार आहे. त्यामुळे तळीरामांना चांगलाच चाप बसणार आहे. वाहतुकीचे नियम तोडून वाहन चालविणाºयांवर कारवाई करणे, त्यांना पुराव्यासह ओळखणेही सुलभ होणार असून वाहतूक सुरळीत आणि सुरक्षित होण्यास मोठी मदत होणार आहे.थेट ३०० मीटर रेंजमधून यातील स्पीडगनमधून फोटोसहित चलन फाडले जाणार आहे. सध्या या वाहनांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. तसेच सर्व्हरचीही तपासणी सुरू आहे. त्यामुळे अजून त्याद्वारे कारवाई केलेली नाही.
‘इंटरसेप्टर व्हेइकल’मुळे अपघातांवरही नियंत्रण, मद्यपी वाहनचालकांना बसणार चाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 1:10 AM