कल्याण-लोकप्रतिनिधींनी सरकारी धान्य वाटपात काळाबाजार करुन हे धान्य कम्यूनिटी किचनच्या नावाखाली उचलले. निकृष्ट जेवणाचा पुरवठा केला. स्वत:च्या मार्केटींगसाठी राजकीय मंडळींनी हा प्रकार केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी कल्याण ग्रामीणचे मनसेचे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.
गोरगरीबांना लॉकडाऊनच्या काळात वाटप करण्यासाठी आलेले सरकार धान्य कम्यूनिटी किचनच्या नावाखाली राजकीय मंडळीनी उचलले. स्वत:च्या मार्केटींगसाठी त्यावर स्टीकर लावले. काही ठिकाणी निकृष्ट दजाचे अन्न वाटप केले. जी खिचडी वाटली जात आहे. ती निकृष्ट दर्जाची आहे. जनावरेसुद्ध ही खिचडी खाणर नाही अशी खिचडी दिली जात आहे. गरीबांच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार आहे. गरीबांचे अन्नधान्य लुबाडणारे राजकीय मंडळीने स्वत:च्या आर्थिक फायदा या कोरोनाच्या काळात साधला आहे. हा घोटाळा दै . लोकमतने उघडकीस आणला आहे. सरकारी धान्य वाटपात काळा बाजार होणार. तो रोखण्यात यावा यासाठी 30 मार्च रोजी एका पत्रद्वारे सरकारी यंत्रणोचे लक्ष आमदार पाटील यांनी वेधले होते. त्याकडे सरकारी यंत्रणोकडून दुर्लक्ष करण्यात आल्याने आज हा प्रकार उघड झाला आहे.
ठाणे, कल्याण डोंबिवली महापलिका व ठाणे जिल्हा परिषद कम्यूनिटी किचनच्या नावाखाली पुरवत असलेली जेवणाची पॅकेट ही निकृष्ट दर्जाची आहेत. नागरीकांच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. कम्युनिटी किचन चांगली संकल्पना होती. प्रशासनातील अधिकारी व राजकीय मंडळींनी स्वार्थ साधल्याने या संकल्पनेला हरताळ फासला गेला आहे. धान्य वितरण व कम्युनिटी किचनमध्ये झालेल्या घोटाळ्य़ाची मुख्यमंत्र्यांनी चौकशी करावी. दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी आमदार पाटील यांनी केली आहे.