ठाणे : ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या खंडणीच्या पहिल्या गुन्ह्यात इक्बाल कासकरने विकलेले ४० तोळे सोन्याच्या दागिन्यांपैकी १० तोळे दागिने शनिवारी ठाणे खंडणीविरोधी पथकाने ठाणे आणि मुंबईतील मालाड येथून जप्त केले. उर्वरित दागिनेही जप्त केले जातील, असे पोलीस सूत्रांनी सांगितले.हा गुन्हा दाखल झाल्यानंतर, काही दिवसांत ठाणेनगर पोलीस ठाण्यात आणखी दोन गुन्हे दाखल झाले. त्यातील पहिल्या गुन्ह्यातील ४० तोळे सोन्याचे दागिने ठाणे आणि मुंबईत विकल्याचे चौकशीत पुढे आले. त्यानुसार, ते जप्त करण्यासाठी खंडणी पथक शनिवारी रवाना झाले.मोक्कांतर्गत कारवाईला वेगखंडणीप्रकरणी अटकेत असलेल्या इक्बाल कासकर, छोटा शकील, इतर पाच जणांविरोधात संघटित गुन्हेगारी कायदा व कलमान्वये कारवाईस वेग आला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव खंडणीविरोधी पथकाने पुढे पाठविला असून, लवकरच कारवाई करण्यात येईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.पुन्हा पथकउत्तर प्रदेशाला रवानाखंडणीप्रकरणी फरार असलेल्या शमीन आणि गुड्डू या दोघांना अटक करण्यासाठी लवकरच खंडणीचे पथक उत्तर प्रदेश आणि बिहार येथे रवाना होणार आहे.
इक्बाल कासकरने विकलेले दागिने जप्त, मोक्कांतर्गत कारवाईला वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 11:16 PM