शहरं
Join us  
Trending Stories
1
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
2
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
3
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
4
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
5
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
6
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
7
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
8
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
9
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
10
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
11
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
12
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
13
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
14
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
15
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 
16
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सला इशान किशनचा पर्याय सापडला! कोण आहे त्याची जागा घेणारा रायन रिकल्टन?
17
शरद पवार, उद्धव ठाकरेंचे राजकारण संपले? दोघांनाही आहे अजून एकेक संधी...
18
"चांगल्या घरातल्या मुली...", मनिषा कोईरालाच्या पदार्पणावर विचारले गेले होते प्रश्न; म्हणाली...
19
IPL Auction 2025: कृणाल पांड्या, नितीश राणासाठी RR vs RCB मध्ये रंगला 'रॉयल' सामना! कुणाचा झाला फायदा?
20
आदित्य ठाकरेंच्या नावाचा आग्रह केला पण...; विरोधी पक्षनेते पदावर भास्कर जाधव काय म्हणाले?

मनोरमधील आयआरबी कंपनीचा डांबर प्लांट विनापरवाना सुरू?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2020 11:52 PM

अहवाल तहसीलदारांकडे : परवानगीची प्रक्रिया सुरू असल्याचा दावा

मनोर : पालघर तालुक्यातील वाडे येथील आयआरबी कंपनीचा एक प्लांट गेल्या दोन वर्षांपासून कोणतीही परवानगी न घेता सुरू असल्याची माहिती उघड झाली आहे. यासंदर्भात कंपनीच्या प्रतिनिधीने परवानगीची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगितले, तर तहसीलदारांना अहवाल पाठवल्याची माहिती महसूल विभागाच्या मंडलाधिकाऱ्यांनी सांगितले.मुंबई-अहमदाबाद महामार्गाचे सहापदरी रस्त्याचे काम सुरू केल्यापासून वाडे येथील आयआरबी कंपनीचा हा डांबर प्लांट सुरू आहे. आधी परवानगी घेऊन काम सुरू होते, परंतु २०१८ पासून त्याची मुदत संपली आहे, मात्र तरीही गेल्या दोन वर्षापासून तो सुरू आहे. आतापर्यंत डांबरमिश्रित खडीच्या लाखो ब्रास मटेरियलचे उत्पादन झाले असून महसूल विभागातील अधिकाऱ्यांच्या आशीर्वादामुळेच कोट्यवधी रुपयांचा महसूल बुडाला असल्याचा आरोप केला जात आहे. काही दिवसांपूर्वी ग्रामस्थ विष्णू उराडे यांनी या प्रकरणी मनोर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती, त्या वेळी विरोध करणाºयांचे जबाबही घेण्यात आले होते. त्यामध्येही मुदत संपली असल्याचे नमूद केले असून ते रिपोर्ट मनोर पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पाठवले होते. मात्र जैसे थे परिस्थिती राहिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.प्लांट सुरू ठेवण्यासाठी मुदतवाढीची पुढील कारवाई सुरू आहे. रस्त्याची कामे सुरू असल्याने हा प्लांट सुरू ठेवण्यात आलेला आहे.- प्रवीण भिंगारे, लायसनिंग मॅनेजर, आयआरबी कंपनीआयआरबीच्या व्यवस्थापकाला अनेक वेळा प्लांट बंद करण्यासाठी सांगितले. लेखी नोटीसही दिली, तरीसुद्धा त्यांनी चालूच ठेवला आहे. आम्ही तिकडे गेलो की आम्हाला दाखवण्यासाठी बंद केला जातो. आम्ही निघाल्यानंतर पुन्हा सुरू होतो. याबाबत तहसीलदारांना रिपोर्ट पाठवला आहे.- संदीप म्हात्रे, मंडलाधिकारी, महसूल विभाग