शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
2
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा
3
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
4
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
5
झटक्यात टँकर खड्ड्यात! पुण्यात सिटी पोस्टच्या आवारात पेव्हर ब्लॉक खचल्याने अपघात, चालक थोडक्यात बचावला
6
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
7
भाजपसाठी प्रतिष्ठेची बनली वैष्णोदेवीची जागा; अयोध्यचेची पुनरावृती टाळण्यावर पक्षाचा भर...
8
नात्याला काळीमा! मुलगा हवा होता... चौथी मुलगी होताच संतापलेल्या बापाने उचललं टोकाचं पाऊल
9
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा अपघात! BSF च्या जवानांनी भरलेली बस खोल खड्ड्यात कोसळली
10
नितेश राणेंवर कठोर कायदेशीर कारवाई करा, अजितदादांच्या आमदाराचे देवेंद्र फडणवीसांना पत्र
11
“राहुल गांधी अन् गांधी कुटुंबावर बोलण्याचा नरेंद्र मोदींना अधिकार नाही”; काँग्रेसची टीका
12
ठाण्यात जिल्ह्यात चाललंय काय? शेजाऱ्याच्या पत्नीवर तिच्या मुलीसमोरच बलात्कार
13
IND vs BAN : विराटची एक चूक नडली! रोहित शर्मा आणि अम्पायरची प्रतिक्रिया सर्वकाही सांगून गेली
14
"सनातन धर्माच्या अस्मितेसोबत 'बलात्कार', आरोपींना...", तिरूपती लाडू प्रकरणावर शंकराचार्य भरडके
15
आयफोनवेडा मुंबईकर; पत्नी-मुलांसाठी खरेदी केले 5 iPhone 16, व्हिडिओ व्हायरल...
16
मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला धक्का, आयटी कायद्यातील सुधारणा रद्द, कुणाल कामराने दिलेले आव्हान
17
चीन पाकिस्तानमध्ये सैन्य तैनात करणार; भारताला घेरण्याचा कट? तज्ज्ञांना वेगळाच संशय
18
तिरुपती बालाजी: अत्यंत पवित्र असतो प्रसाद, खुद्द लक्ष्मीने केले होते लाडू; पाहा, मान्यता
19
संजय राऊतांनी दिला इशारा; पटोले म्हणाले, "त्यांचं फार ऐकत जाऊ नका"
20
Shakib Al Hasan चं ते 'मॅजिक; जाणून घ्या गळ्यातला काळा धागा चघळण्यामागचं त्याचं 'लॉजिक'

इस्त्री करताना फुलली शायरी...

By admin | Published: April 13, 2017 3:05 AM

‘मैंने माना की तुम उल्फत को सजा लिखोंगे, प्यार को आग और मोहब्बत को दगा लिखोंगे,

- मुरलीधर भवार,  कल्याण

‘मैंने माना की तुम उल्फत को सजा लिखोंगे, प्यार को आग और मोहब्बत को दगा लिखोंगे, तुमने शैतान को तो शैतान लिखा जामी, इस नये दौर के इन्सान को लिखोंगे...’हा शेर आहे कल्याणचे जामी कल्याणवी या उर्दू शायरचा. मस्त कलंदर असलेले जामी कल्याणवी हे वयाच्या ६८ वर्षी दोन ते तीन लॉण्ड्रीत काम करून उदरनिर्वाह करत आहेत. शायरीचा त्यांना छंद आहे. कुवेत येथे १४ एप्रिलला होणाऱ्या मुशायरा कार्यक्रमात सहभागी होण्याचे आमंत्रण त्यांना मिळाले आहे. त्यामुळे ते गुरुवारी विमानाने कुवेतला उड्डाण करणार आहेत. ‘माझे आयुष्य पायी चालण्यात गेले. पण, शायरीमुळे विमानाने प्रवास करण्याची संधी मिळाली आहे,’ असे आवर्जून सांगतात.जामी कल्याणवी हे त्यांचे शायरीतील नाव आहे. त्यांचे मूळ नाव इक्बाल गुलाम मुस्तफा शेख आहे. त्यांचा जन्म कल्याणमधील मुस्लीम मोहल्ल्यात झाला. आई गृहिणी होती. वडील मोलमजुरी करून कुटुंब सांभाळत होते. घरची परिस्थिती बिकट असल्याने त्यांनी उर्दू माध्यमातून इयत्ता तिसरीपर्यंत शिक्षण घेतले. मात्र, त्यांची उर्दूवर चांगलीच पकड आहे. किशोरवयातच त्यांना काही सुचू लागले. सगळ्यात प्रथम त्यांनी एक ईश्वराच्या स्तुतीविषयी नातेपाक कलाम लिहिला. त्यानंतर, त्यांनी शायरीचा छंद जोपासला. तो जिवापाडच. अविवाहित असलेले जामी हे पोटाला अन्न मिळेल इतकी कमाई करतात. मुस्लीम मोहल्ल्यातील तीन लॉण्ड्रीमध्ये कपड्यांना इस्त्री करतात. आलटूनपालटून काम केल्यावर त्यांना चार पैसे मिळतात. त्यात त्यांची गुजराण होते. ते कल्याणचे असल्याने त्यांनी शायरीतील नावही कल्याणवी असे धारण केले. जामी यांनी कोकण, खान्देश, बेळगाव, मध्य प्रदेशात आतापर्यंत १००पेक्षा जास्त मुशायऱ्यांमध्ये सहभाग घेतला आहे. त्यांच्या शायरीचे लोक चाहते आहेत. कोणत्याही सद्य:परिस्थितीवर भाष्य करणारी त्यांची शायरीही उर्दू जाणकारांमध्ये चांगलीच प्रसिद्ध आहे. जामी यांना कल्याणच्या कार्यक्रमात कोणी बोलवले नाही, याची खंत त्यांना आहे. तसेच कल्याणमधील मुस्लीम संघटनांनी त्यांचा कधी गौरव केलेला नाही. अन्सारी यांचा सत्कारजामी यांचे शायर मित्र तस्लीम अन्सारी हे महाडला राहतात. अन्सारी यांचे विद्यार्थी जामी यांच्या शायरीचे चाहते आहेत. त्यापैकी अनेक विद्यार्थी हे कुवेतमध्ये कामाला आहेत. या विद्यार्थ्यांनी मिळून अन्सारी यांचा एक सत्कार कुवेतला १४ एप्रिलला ठेवला आहे. या वेळी मुशायराही होणार आहे. या मुशायऱ्यासाठी जामी यांना आमंत्रित केले आहे. जामी यांची शायरी अन्सारी यांनाही आवडते. त्यांनी जामी यांना व्हिसा तसेच विमानाचे तिकीट काढून दिले आहे.