शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
2
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
3
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
4
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
5
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
6
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
7
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
8
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
9
'तुम्ही मला गप्प करू शकणार नाही...', काँग्रेसच्याच कार्यक्रमात राहुल गांधींचा माईक बंद झाला
10
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
11
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 
12
Gold Silver Price Today 26 November: सोनं ४,२३० आणि चांदी १०,२४० रुपयांनी झालं स्वस्त; आता इतक्या किंमतीत मिळतंय १० ग्राम सोनं
13
धीरेंद्र शास्त्रींवर अज्ञाताने मोबाईल फेकला; गालाला लागला, म्हणाले...
14
पुढील वर्षी २०२५ मध्ये सिनेप्रेमींना मिळणार बॉलिवूडची मेजवानी! हे बहुचर्चित सिनेमे होणार रिलीज
15
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
16
Video - ९० हजारांचं बिल पाहून ग्राहकाचं डोकं फिरलं, रागाच्या भरात हातोड्याने फोडली स्कूटर
17
राज्याभिषेकावरून वाद, उदयपूर पॅलेसमध्ये राडा, महाराणा प्रताप यांचे वंशज आमने सामने
18
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
19
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
20
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?

असे झाले ‘इसिस’चे मुंब्रा ते औरंगाबाद कनेक्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 12:36 AM

‘उम्मत-ए-मोहम्मदीया’ या ग्रृपमधील सदस्य परदेशातील हॅन्डलरच्या संपर्कात असून ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेच्या विचारांनी प्रेरित असल्याची ‘पक्की खबर’ एटीएसला मिळाली होती.

- जितेंद्र कालेकरठाणे : ‘उम्मत-ए-मोहम्मदीया’ या ग्रृपमधील सदस्य परदेशातील हॅन्डलरच्या संपर्कात असून ‘इसिस’ या दहशतवादी संघटनेच्या विचारांनी प्रेरित असल्याची ‘पक्की खबर’ एटीएसला मिळाली होती. त्यानंतर वेषांतर करुन एटीएसच्या पथकाने या सर्वांवर तीन ते चार महिन्यांपासून पाळत ठेवली. मुंब्रा ते औरंगाबाद असे या टोळीचे कनेक्शनही यातून उघड झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीमुंबई आणि औरंगाबाद या दोन शहरांमध्ये घातपाती कारवाया होणार असल्याची खबर आॅगस्ट २०१८ मध्येच महाराष्टÑ दहशतवाद विरोधी पथकाला (एटीएस) ला मिळाली होती. याच माहितीच्या आधारे मुंब्रा येथून औरंगाबादमध्ये अलिकडेच आलेल्या मोहसीन खान याच्यावर या पथकाने पाळत ठेवली. त्यानंतरच २२ जानेवारी रोजी मुंब्रा आणि औरंगाबाद येथून नऊ संशयितांना ताब्यात घेतले.गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि औरंगाबाद शहरातील काही तरुण हे ‘इसिस’च्या संपर्कात असून ते आणखी काही तरुणांमध्ये जहाल विचार रुजवून त्यांना इसिसकडे येण्यासाठी प्रेरित करीत आहेत. तसेच काही जण या दोन शहरांमध्ये घातपाती कारवाया करण्याच्या तयारीत असल्याची माहिती औरंगाबाद ‘एटीएस’च्या पथकाला मिळाली होती. यामध्ये मुंब्रा येथील जमान, सलमान, फहाद, मजहर आणि शादाब यांचा तर औरंगाद येथील मोहम्मद तकी, मोहसिन, मोहम्मद मुशाहिद आणि मोहम्मद सफराज यांचा समावेश होता. ही नावे मिळाल्यानंतर मुंबईच्या ‘एटीएस’ पथकाने त्यांच्या राहण्याच्या ठावठिकाण्यांचा शोध घेतला. यात मोहसिन खान या संशयिताची पहिली माहिती या पथकाच्या हाती लागली. त्यातून त्याचा दिनक्रम, त्याच्या जाण्या येण्याची ठिकाणे, नातेवाईक तसेच त्यांची खाण्याची आणि आरामाची ठिकाणे इथपासून ते दिवसभरात कोणाशी किती वेळ काय संभाषण करतात, यावर एटीएसच्या पथकांनी साध्या वेषामध्ये पाळत ठेवली. हे साध्य होण्यासाठी पथकातील सर्वांनीच या संशयितांच्या पेहरावाशी मिळता जुळता पेहराव केला. यासाठी बहुतांश जणांनी दाढीही राखली. आॅगस्ट २०१८ पासून त्यांचे हे ‘वर्कआउट’ सुरु होते. २४ डिसेंबर २०१८ रोजी मुंब्रा येथील मोहसिन खान हा त्याच्या काही साथीदारांसह औरंगाबाद येथे वास्तव्याला आला.>एटीएसने केली होती संशयित आरोपींची कोंडीमोहसिन आणि त्याच्या साथीदारांनी ‘उम्मत-ए-मोहम्मदीया’ हा ग्रुप तयार केला असून यातील सदस्य हे परदेशातील ‘इसिस’च्या संपर्कात आहेत. ही माहिती मिळाल्यानंतरच या सर्व संशयितांवर एटीएसने करडी नजर ठेवली होती. मोहसिन आणि त्याच्या साथीदारांच्या मोबाइलवर नजर ठेवण्यासह सर्वच बाजूंनी त्यांना घेरण्यास सुरुवात केली. यातूनच औरंगाबाद आणि मुंबई हे या संशयितांच्या निशाण्यावर असल्याचीही माहिती मिळाल्यानंतर गोपनीयरीत्या एटीएसने ही कारवाई केली.