ठाणे : राज्यात प्रसिद्ध असलेल्या ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला वर्षभरात ३० कोटींचा निव्वळ तर ११८ कोटींचा ढोबळ नफा झाला ठाणे, पालघर जिल्ह्यातील तरुणांना नवीन उद्योगधंदे उभारण्यासाठी आर्थिक पाठबळ देण्यासह कृषी विकासासाठी कृषी विषयक अभ्यासाठी शेतकऱ्यांना लवकरच इस्रायलला पाठवण्यात येणार असल्याची माहिती बँकेचे अध्य राजेंद्र पाटील यांनी मंगळवारी दिली. ते बँकेच्या ६० व्या सर्वसाधारण सभेत बोलत होते.येथील गडकरी रंगायतन येथे बँकेची वार्षिक सभा पार पडली. यावेळी व्यासपीठावर खासदार कपील पाटील यांच्यास खासदार राजेंद्र गावीत, आमदार किसन कथोरे, संजय केळकर, पांडुरंग बरोरा, निरंजन डावखरे, विलास तरे आदीं आमदारांसह बँकेचे उपाध्यक्ष भाऊ कुºहाडे, माजी खासदार बाळीराम जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी भगिरथ भोईर उपस्थित होते.बँकेच्या सहा हजार २६२ कोटींच्या ठेवी असून त्यात वर्षभरात दोन हजार २५ कोटींची वाढ झाली आहे. वर्षभरात बँकेच्या नवीन ११ शाखा सुरू केल्याचे ते म्हणाले. बँकेच्या सेवा सहकारी बँकांच्या सचिवाना बँकेमार्फत वेतन देण्याचे सांगून त्यांनी जिल्ह्यात दुग्ध महासंघ सुरू करण्यासाठी बँक प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. वर्षभरात सात हजार कोटीच्या ठेवी वाढवण्यासाठी जोदार प्रयत्न सुरू केल्याचेही त्यांनी अध्यक्षीय भाषणात नमूद केले.यावेळी खासदार पाटील यांनी सेंद्रीय भाजीपाला उत्पादनाकडे शेतकºयांना वळवण्याची अपेक्षा व्यक्त केली.>शेतकºयांना दोन टक्के व्याज माफीबँकेचे ११ वर्ष अध्यक्षपदी राहिलेले आर.सी.पाटील यांनी शेतकºयांची परिस्थिती पाहता, त्यांना वीज, पाणी मोफत देण्याचा महत्त्वाचा ठराव बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये मांडला. जिल्ह्यातील शेती, माती, रेती, मच्छीमारी जवळपास संपली आहे. त्यामुळे या भागातील शेतकºयांना दोन टक्के व्याजमाफी देण्याची मागणी बँकेचे अध्यक्ष आर.सी. पाटील यांनी केली.
कृषी विकास अन् कृषी विषयक अभ्यासासाठी शेतकरी जाणार इस्रायलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 3:00 AM