शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल
2
घर फोडायचे पाप आई-वडिलांनी शिकवले नाही; शरद पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका
3
आजचे राशीभविष्य: ७ राशींना आनंदी दिवस, लाभाचे योग; कार्यात यश, चांगली बातमी मिळेल
4
पोलिस-वकिलांमध्ये कोर्टातच हाणामारी; ११ वकील जखमी, पोलिस ठाण्याला आग
5
कुणाकडून कोण रिंगणात... घोळ मिटेना! जागावाटपाचा सस्पेन्स कायम; आता माघारीवर नेत्यांमध्ये होणार घमासान
6
आबांनी माझा केसाने गळा कापण्याचा प्रयत्न केला : अजित पवार
7
इस्रायलच्या हल्ल्यात गाझामध्ये ६० जण ठार; मृतांमध्ये महिला आणि लहान मुलांचे प्रमाण अधिक
8
कॅनडात टेस्ला कारचा अपघातामुळे स्फोट; नाशिकचा युवक ठार, डीएनएवरून पटली ओळख 
9
कोकण रेल्वेच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल; १ नोव्हेंबरपासून होणार अमंलबजावणी
10
अयोध्येत ५५ घाटांवर २८ लाख दिवे लागणार, ऐतिहासिक दीपोत्सवाचा मोठा उत्साह
11
जर्मनी, जपानमध्ये आजही का होतात बॉम्बस्फोट?
12
फक्त गणना की जातगणना? सध्या औत्सुक्याचा विषय, पण उत्तर लवकरच मिळेल 
13
सरकारकडून लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न, प्रियांका गांधी यांचा प्रचारसभेत आरोप
14
भारत-चीन सैन्य मागे घेण्यास तयार, पूर्व लडाखमध्ये डेमचोक आणि डेपसांगवर तोडगा अंतिम टप्प्यात 
15
निदान कुलगुरुंना तरी राजकारणापासून दूर असू द्या !
16
ढोंगी लोकांच्या भुलाव्याला आपण का फसत गेलो?
17
नायजेरियन्सच्या ड्रग्ज पार्टीवर छापा, २६ लाख ७७ हजाराचे एमडी हस्तगत; २० नायजेरियनवर गुन्हा दाखल
18
हिवाळ्यात मुंबईतून रोज ९६४ विमानांच्या फेऱ्या
19
बी. फार्मसीच्या प्रवेशाला आचारसंहितेचा फटका, महाविद्यालयांची मान्यता प्रक्रिया रखडल्याने प्रक्रिया स्थगित
20
उलवेतून १ कोटीचे कोकेन हस्तगत, आफ्रिकन व्यक्तीला अटक

बेशुद्ध व्यक्तीला कोणत्याही परीस्थितीत काहीही खायला, प्यायला देऊ नये- डॉ. अपूर्वा देशपांडे

By प्रज्ञा म्हात्रे | Published: May 19, 2024 4:43 PM

बेशुद्ध रुग्णाला त्या अवस्थेत पाणी पाजले तर त्याचा तात्काळ मृत्यू होऊ शकतो, अशी माहिती सीपीआर तज्ज्ञ डॉ. अपूर्वा देशपांडे यांनी दिली.

प्रज्ञा म्हात्रे, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: बेशुद्ध रुग्ण हा कधीच बेशुद्धीमुळे तात्काळ मृत्यू पावत नाही. उलट, त्याला बेशुद्ध अवस्थेत पाठीवर झोपावल्यावर त्याची जीभ श्वास मार्गात अडकते आणि त्याचा श्वास अडकतो, त्यामुळे त्याचा मृत्यू होतो. त्याला कुशीवर झोपून ठेवल्यास त्याची जीभ श्वास मार्गात अडकणार नाही आणि त्या व्यक्तीचा श्वास सुरू राहील. कोणत्याही परिस्थीतीत बेशुद्ध अवस्थेत काहीही खायला, प्यायला देऊ नये. एखादा व्यक्ती बेशुद्ध पडल्यावर त्याला पाणी प्यायला दिले जाते किंवा त्यावर पाणी शिंपडले जाते. बेशुद्ध रुग्णाला त्या अवस्थेत पाणी पाजले तर त्याचा तात्काळ मृत्यू होऊ शकतो अशी माहिती सीपीआर तज्ञ डॉ. अपुर्वा देशपांडे यांनी दिली.

डॉक्टर तुमच्या भेटीला या कार्यक्रमात रविवारी सहयोग मंदिर येथे सुप्रसिद्ध हृदयविकार तज्ज्ञ डॉ दयानंद कुंबळा यांच्या मार्गदर्शनाखाली सीपीआर या विषयावर डॉ. देशपांडे यांनी मार्गदर्शन केले. एखादा व्यक्ती अचानक बेशुद्ध पडला तर त्याचा श्वास चालू आहे की नाही हे आधी तपासावे आणि त्याला लगेचच डाव्या किंवा उजव्या कुशीवर ठेवावे. श्वास बंद असेल तर तात्काळ सीपीआर सुरू करावा हे सांगताना डॉ. देशपांडे यांनी सीपीआरची प्रात्यक्षिके कृतीद्वारे दाखविली.

बेशुद्ध रुग्णाला पाठीवर झोपवल्यास त्याची जीभ श्वास मार्गात अडकल्याने मेंदूला ऑक्सीजन पुरवठा पुर्ण बंद होतो. त्यामुळे पुढच्या तीन ते चार मिनिटांत त्याचा मृत्यू होतो. जीभ अडकल्यावर बेशुद्ध व्यक्तीची हृदय आणि फुप्फुुसाची क्रीया बंद पडते. सीपीआरमध्ये दोन ते अडीच मिनिटे दाब द्यावा जेणे करुन श्वास आणि हृदयक्रिया चालू होते. ३० वेळा छातीवर दाब आणि माऊथ टू माऊथ ब्रिदींग दोन वेळा द्यावी. छातीवर कुठे दाब द्यायचा, श्वास मार्ग कसा उघडायचा हे डॉ. देशपांडे यांनी पुढे सांगितले. सीपीआरचे प्रोटोकॉल मात्र कटाक्षाने पाळावे लागतात. सीएबी (कॅब) यात सी म्हणजे ३० वेळा छातीवर दाब देणे, ए म्हणजे श्वास मार्ग ओपन करायचे. त्याचे तंत्र म्हणजे डोके मागे आणि हनुवटी वर करायची आणि बी म्हणजे ब्रिदींग यात तोंडावाटे श्वास द्यायचा. जोपर्यंत डॉक्टर येत नाही तोपर्यंत सीपीआर चालू ठेवायचे. यावेळी त्यांनी बेशुद्ध रुग्ण कसा ओळखायचा, त्याला कसे हाताळायचे हे सांगितले.

टॅग्स :thaneठाणे