कल्याण : आजची शिक्षण क्षेत्रतील परिस्थिती अत्यंत वाईट आहे. शिक्षण क्षेत्राकडे कमाईचे साधन म्हणून पाहिले जात आहे. शिक्षण क्षेत्राकडे कमाईचे साधन म्हणून पाहणे ही आपली संस्कृती नाही. आपल्या देशातील शिक्षण महर्षीनी डोक्यावर टाईपरायटर घेऊन शिक्षण संस्था उभारल्या आहेत. याचा विसर आजच्या तथाकथित शिक्षण महर्षीना पडला असल्याची खंत लोकसभा अध्यक्षा सुमित्र महाजन यांनी येथे व्यक्त केली. यावेळी महाजन या प्रचंड भावूक झाल्या होत्या. त्यांच्या डोळ्य़ात अश्रू तरळले होते. त्या पोटतिटकेने बोलत होत्या. याज्ञवल्क्य या संस्थेच्यावतीने याज्ञवल्क्य पुरस्काराचे वितरण सोहळा लोकसभा अध्यक्षा महाजन यांच्या हस्ते नूतन विद्यामंदिरात आज सायंकाळी पार पडला. यावेळी महाजन यांनी उपरोक्त खंत व्यक्त केली. महाजन यांच्या हस्ते याज्ञवल्क्य पुरस्काराने बदलापूरातील ग्रंथसखा वाचनालयाच्या शामसुंदर जोशी यांना प्रदान करण्यात आला. तर संशोधन व लेखनासाठीचा पुरस्कार स्मिता कापसे यांना महाजन यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 21 हजार रुपये रोख, शाल श्रीफळ आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप होते. याप्रसंगी खासदार कपिल पाटील, आमदार नरेंद्र पवार, महापौर राजेंद्र देवळेकर आणि याज्ञवल्क्य संस्थेचे अध्यक्ष राधाकृष्ण पाठक, राजीव जोशी, मिंलीद कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. महाजन यांनी सांगितले की, कल्याणचा भारदस्तपणा रामभाऊ म्हाळगी आणि रामभाऊ कापसे यांनी टिकवून ठेवला. रामभाऊ कापसे हे मला गुरुतुल्य होते. त्यांची मी विद्यार्थीनी त्यांच्या पत्नीही त्याच तोडीच्या असल्याने त्यांचे संशोधन हे मौल्यवान आहे. आज माझ्या हस्ते गुरुपत्नीचा सत्कार झाला. त्यामुळे मला मी धन्य समजते. पुरस्कार देणारी संस्था ही याज्ञवल्क्य असल्याने तिला वेदाचे अधिष्ठान आहे. गेल्या अनेक वर्षापासून ही संस्था सामाजिक कार्य करीत आहे. तुटपंज्या खर्चात व वर्गणीवर संस्था चालविणो कठीण असते. त्याचा वस्तूपाठ मराठी संस्थांकडून इतरांनी घेतला पाहिजे असे आवाहन महाजन यांनी यावेळी केले. सर्वानी एकत्र येऊन संस्था चालविल्यास ती संस्था चांगल्या प्रकारे समाज कार्य करु शकते. स्मिता कापसे यांच्या प्रमाणोच जोशी यांच्या कार्याचा सत्कार झाला. ग्रंथालयातून वाचकांना मार्गदर्शन करणारी व्यक्ती असली पाहिजे. जी व्यक्ती ग्रंथालयात आलेल्या व्यक्तीला काय वाचले पाहिजे. कोणत्या पुस्तकानंतर काय वाचावे हे सांगेल. महाराष्ट्रात ग्रंथ सखा असलेल्या जोशी यांना पाहिल्यावर कळते महाराष्ट्राचे भवितव्य खरोखरच उज्जवल आहे असा विश्वास महाजन यांनी व्यक्त केला.
पळून जाणारी मुलगी...मी काम करुन शिक्षण घेत असल्याने रामभाऊच्या वर्गात माझी अनेकदा गैरहजेरी असे. त्यामुळे रामभाऊ मला गंमतीने पळून जाणारी मुलगी असे म्हणत अशी आठवणही महाजन यांनी सांगितली. रामभाऊ प्रमाणोच त्यांच्या पत्नी स्मिता या त्यांच्या छायाज्योती नसून स्वयंप्रकाशाने तेवणा:या दीपज्योती आहे असे गौरवोद्गार महाजन यांनी यावेळी काढले.
आनंदबाई जोशी याचे पोस्ट टिकीट काढण्याची मागणीपहिल्या महिला डॉक्टरकीचा किताब मिळविणा:या डॉ. आनंदीबाई जोशी या कल्याणच्या होत्या. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ केंद्र सरकारने आनंदीबाई जोशी यांचे पोस्टाचे तिकीट काढावे अशी मागणी आमदार नरेंद्र पवार यांनी लोकसभा अध्यक्षा महाजन यांच्याकडे केली.