शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'मी समीर भुजबळांचं नाव घेऊन धमकी दिली नाही'; सुहास कांदेंचा खुलासा
2
निवडणुकीचे टेन्शन...! उमेदवाराने मतदान केंद्रावर प्राण सोडला; बीडमधील घटना
3
बिटकॉइन प्रकरण : "त्या ऑडिओ क्लिपमधील आवाज सुप्रिया सुळे आणि नाना पटोलेंचाच”; अजित पवार स्पष्टच बोलले 
4
“पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून सुप्रिया सुळे, नाना पटोलेंवर आरोप”: बाळासाहेब थोरात
5
वर्ध्यात कराळे मास्तरांना भररस्त्यात मारहाण; भाजप कार्यकर्त्याने हल्ला केल्याचा दावा
6
“काँग्रेस एक नंबरचा पक्ष ठरेल, मविआचे सरकार येणार ही काळ्या दगडावरची रेष”: नाना पटोले
7
‘तो’ आवाज सुप्रिया सुळेंचा...; देवेंद्र फडणवीसांसोबत अजित पवारांनीही स्पष्टच सांगितलं
8
अमेरिकेने युक्रेनमधील दुतावास बंद केला; बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याने रशिया खवळला
9
झारखंडने महाराष्ट्राला पछाडले! तिकडे दुपारी एक वाजेपर्यंत ४७.९२ टक्के, इकडे एवढेच मतदान
10
५५ सेकंदाचा Video, ६ पानांची चिठ्ठी...; गर्लफ्रेंड करायची ब्लॅकमेल, तरुणाने उचललं 'हे' पाऊल
11
"ही माणसं धोकेबाज निघाली, त्यांनी..."; उद्धव ठाकरे गटाचा काँग्रेसवर निशाणा
12
गूढ वाढलं..! शेजाऱ्यांनी ऐकला भांडणाचा आवाज, मृत्यूपूर्वी हर्षितासोबत काय घडलं?
13
IND vs AUS: रोहित, गिल, शमी संघात नाहीत; 'या' खेळाडूचा कसोटी 'डेब्यू' जवळपास निश्चित
14
हार्दिक पांड्या बनला T20 क्रमावारीत नंबर १! तिलक वर्माचाही Top 3 मध्ये दिमाखात प्रवेश
15
Fact Check : रोहित शर्माच्या मुलाच्या नावाने 'ते' फोटो होताहेत व्हायरल; जाणून घ्या, 'सत्य'
16
Kedar Dighe : केदार दिघेंवर पैसे वाटप केल्याचा शिंदे गटाचा आरोप, पोलिसांत गुन्हा दाखल
17
लेकीचं नाव 'ऐजाह' ठेवल्यामुळे ट्रोल झाली टीव्ही अभिनेत्री, आले आक्षेपार्ह मेसेज; म्हणाली...
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: बारामतीत राडा! शर्मिला पवारांचा मतदारांना दमदाटी केल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?
19
'या' इलेक्ट्रिक टू व्हीलरचा जलवा, वर्षभरात विक्री 10 लाखांच्या पुढे!
20
अखिलेश यादव यांच्या आरोपांनंतर EC ची मोठी कारवाई; निवडणूक आयोगाने दिल्या सूचना, अनेक अधिकारी निलंबित

इट स्मार्ट सिटीज चॅलेंज : ठाण्याचा देशातील टॉप २० मध्ये समावेश; महाराष्ट्रातून निवड झालेले एकमेव शहर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2021 12:09 PM

१०९ शहरांचा होता सहभाग

ठाणे : स्मार्ट सिटीज मिशन आणि फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या इट स्मार्ट सिटीज चॅलेंजमध्ये ठाणे शहराचा देशातील पहिल्या २० शहरांच्या यादीत समावेश झाला आहे. महाराष्ट्रातून निवड झालेली ठाणे महापालिका एकमेव ठरली आहे.१५ एप्रिल २०२१ रोजी सुरू झालेल्या या स्पर्धेत देशातील सर्व १०० स्मार्ट शहरांसह एकूण १०९  शहरांनी भाग घेतला होता. स्पर्धेच्या पुढील टप्प्यासाठी निवडलेल्या शहरांना मिलान अर्बन फूड पॉलिसी पॅक्ट, फूड फाउंडेशन यासह इतर आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांसमोर सादरीकरण करावे लागणार आहे. १४ ते १७ डिसेंबर या कालावधीत या शहरांना आपले सादरीकरण करावे लागणार आहे. यासोबतच शहराला खाद्यपदार्थांबाबत जागरूक आणि संवेदनशील बनविण्यासाठी पुढील तीन वर्षांची रणनीती आखण्यात येणार आहे. स्कोअरकार्ड, व्हिजन फॉर्म आणि सादरीकरणात मिळालेल्या गुणांच्या आधारे टॉप ११ शहरांची निवड करण्यात येणार आहे.  स्पर्धेच्या पहिल्या टप्प्याचे काम ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड आणि अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र शासन यांनी संयुक्तपणे पाहिले. अन्न परवाना, खाद्यपदार्थ नोंदणी, इट राइट कॅम्पस, इट स्मार्ट स्कूल, स्वच्छता रेटिंग, अन्न भेसळीची ऑन स्पॉट तपासणी या आव्हानांसाठी विहित केलेल्या कामांवर व्यापक प्रमाणात जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे. या शहरांची निवडप्राथमिक निवड चाचणीत ठाणे, आग्रा, अजमेर, भोपाळ, बेंगळुरू, चंदीगड, इंदुर, जबलपूर, पणजी, पटना, राजकोट, सागर, शिमला, सुरत, तुमाकुरू, तिरुनेलवेली, बडोदा, उज्जैन, जम्मू आणि रौरकेला आदी शहरांची निवड करण्यात आली आहे.

टॅग्स :thaneठाणेSmart Cityस्मार्ट सिटी