शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

गुरुजींनी शिक्षा केल्यानेच अधिकारी होऊ शकलो

By ऑनलाइन लोकमत | Published: September 05, 2019 2:12 AM

सर्वसामान्य गरिब कुटुंबातील पुंडलीक साळुंखे यांच्या आयुष्याला आकार देणारे ठाकू र गुरुजी

अलिबाग : घरची परिस्थीत अत्यंत बेताचीच होती. त्यामध्ये शिक्षण घेणे हे परवडणारे नव्हते, परंतु वडिलांची सक्त ताकीत होती शिक्षण हे घेतलेच पाहिजे, तर आईचे स्वप्न होते की मी मोठा झाल्यावर मोठा साहेब व्हावे. त्यामुळे जिद्दीने शिक्षण घेण्याचा दृढ निश्चय केला. प्रचंड मेहनत घेऊन शिक्षण पूर्ण केले आणि बिडीओ (गट विकास अधिकारी) झालो. त्या दिवशी आमच्या घरात कोणाचाच आनंद गगनात मावत नव्हता. आई सर्वांना सांगत होती पुंडलीक मोठा साहेब झाला. आईच्या आनंदाला पारावार उरलेला नसल्याने माझा उर भरुन आला. उपमुख्यकार्यकारी अधिकारी पदावर आहे. त्यामुळे माझ्या कुटुंबातील सर्वांना आणि माझ्या शिक्षकांना माझा अभिमान आहे.गुरुजींनी मारल्याचा राग मनात होताच. पुढे आणखीन मोठा झाल्यावर माहिती घेतली की या शिक्षकांपेक्षा मोठा कोण असतो. त्याचा पगार कोण देता. त्यात असे समजले की बीडीओ (विस्तार अधिकारी) मोठा साहेब असतो. मग काय तेवढेच लक्षात ठेवले आणि बीडीओ बनायचे आणि गुरुजींनाच धडा शिकवायचा अशीच मनाशी खूणगाठ बांधली. जिद्दीने शिक्षण पूर्ण केले आणि बीडीओ झालो. ठाकूर गुरुजींनी मला मारले नसते, तर आज मी बीडीओ झालो नसतो. त्यांनी मला माझ्या चुकीची शिक्षा दिली होती. मात्र मी नकळत गुरुजींना शिक्षा देण्याच्या नादात मोठा साहेब झालो होतो हे कळलेच नाही. मला मिळालेले यश हे माझ्या गुरुजींनमुळेच मिळाले आहे.जेव्हा शिक्षक मित्र बनतात तेंव्हा...माझ्या शिक्षणातील प्रगती पाहून ठाकूर गुरुजी आनंदी होते. मी जेव्हा बीडीओ झालो तेंव्हा ठाकूर गुरुजींनी भेटण्याचे ठरवेल. माहिती घेतल्यावर कळले की ठाकूर गुरुजी हे रसायनी येथील शाळेवर आहेत. तडक त्यांना भेटण्यासाठी गेलो आणि प्रथम त्यांचे पाय धरले. त्यांनीही मला जवळ घेतले. आज मी त्यांना भेटतो तेंव्हा ते मला मित्रा प्रमाणेच वागवतात. यापेक्षा मोठे समाधान काय असेल.खालापूर तालुक्यातील वावोशी येथील जीवन शिक्षण विद्या मंदिर या शाळेत प्राथमिक शिक्षणाला सुरुवात झाली. लहानपणापासूनच मस्ती करायचो. मी, माझा मित्र दीपक झेमसे, दीपक म्हात्रे, माई शेट्ये, आशा ओसवाल असे आम्ही रस्त्याने चालत होतो. मी चालतानाच माझ्या मित्रांसोबत मस्ती करायला सुरुवात केली. त्यावेळी आमच्या सोबत आमचे शिक्षक दशरथ ठाकूर होते. त्यांनी मला दोन वेळा हटकले मात्र माझी मस्ती सुरुच होती. त्यावेळी त्यांनी मला रस्त्यातच मारले. गुरुजींनी मारल्याचा राग माझ्या मनात होता. त्याच रागात परीक्षा दिली आणि चांगल्या मार्कांनी पास झालो.कसलेल्या मल्लासोबत तीन तास कुस्ती...माझ्या खोडकर आणि मस्तीखोर स्वभावामुळे सर्वच शिक्षक हैराण होते. पिंगळे गुरुजीही त्यातीलच एक आहेत. त्यांनी माझी कुस्ती वर्गातील शांताराम पाटील याच्याबरोबर लावली. शांताराम हा कुस्ती खेळणाराच होता म्हणजे कसलेल्या मल्लासोबत पिंगळे गुरुजींनी मला झुंझवले तो मला सातत्याने खाली पाडण्याचा प्रयत्न करत होता. मात्र तीन तास झाले तरी हार पत्करण्यास कोणीच तयार नव्हते. शेवटी गुरुजींनीच सामान बरोबरीत सोडवला.

टॅग्स :raigad-pcरायगडRaigadरायगडalibaugअलिबागTeachers Dayशिक्षक दिन