ठाणे - कल्याण डोंबिवलीत वास्तव्याला असलेले आणि मुंबईत अत्यावश्यक सेवेत कार्यरत असलेल्या कर्मचा:यांना कोरोनाची लागण होत आहे. त्यांच्यामुळे कोरोनाची संख्या कल्याण डोंबिवलीत वाढली आहे. या कर्मचाऱ्यांची मुंबईत राहण्याची व्यवस्था केल्यास कल्याण डोंबिवलीतील रुग्णांची संख्या कमी होऊन महापालिका क्षेत्र रेड झोनमधून ग्रीन झोनमध्ये येऊ शकते. अजूनही वेळ गेलेली नाही. याकडे कल्याण ग्रामीणचे मनसे आमदार राजू पाटील यांनी लक्ष वेधले आहे.
यासंदर्भात पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना tweet केले आहे. कल्याण डोंबिवली हद्दीत कालर्पयत 53क् कोरोना बाधित रुग्ण होते. महापालिका हद्दीत राहणारे व मुंबईत कार्यरत असलेल्या कर्मचा:यांना कोरोनाची लागण होते. त्यामुळे कल्याण डोंबिवलीची कोरोना रुग्णांची संख्या जास्त दिसत आहे. प्रत्यक्षात कल्याण डोंबिवलीत कोरोनाची लागण होण्याची संख्या या कर्मचाऱ्यांच्या तुलनेत केवळ 10 टक्केच आहे. या मुंबईतील कर्मचाऱ्यांची मुंबईतील वास्तव्याची सुविधा करा अशी मागणी जोर धरु लागल्यावर या कर्मचा:यांना प्रतिबंध करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, या निर्णय अंमलात आणण्यापूर्वीच तो रद्दबातल करण्यात आला. हा निर्णय रद्द करताना मुंबईत कर्मचा:यांची राहण्याची व्यवस्था झाल्यावर त्याची अंमलबजावणी केली जाईल असे स्पष्ट करण्यात आले होते. त्यानंतरही परिस्थिती बदललेली नाही. परिस्थिती जैसे थे आहे.
रुग्णांची संख्या जास्त असल्याने कल्याण डोंबिवली कोरोनाचा हॉटस्पॉट आहे. त्यामुळे कल्याण डोंबिवली रेड झोनमध्ये आहे. या रेड झोनमुळे शहरातील लॉकडाऊन शिथील केला जात नाही. त्याचा फटका सर्व सामान्यांना बसत आहे. अजूही वेळ गेलेली नाही. लवकरच काही निर्णय घेतल्यास कल्याण डोंबिवली रेड झोनमधून ग्रीनझोनमध्ये येऊ शकतो. सरकारने याबाबत पुनर्विचार करण्याची गरज आहे याकडे आमदार पाटील यांनी लक्ष वेधले आहे.