ठाणे : समृद्धी महामार्गातील बाधित शेतकºयांना अद्यापही राहत्या घरांचा मोबदला मिळालेला नसून शेतकºयांची अवहेलना केली जात असल्याचा आरोप करत शहापूर, भिवंडी आणि कल्याण तालुक्यांतील शेतकºयांनी २५ फेब्रुवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जागरण गोंंधळ घालण्यासह सामूहिक मुंडण करून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गात शेतजमीन गेलेल्या शेतकºयांची संबंधित विभागाच्या अधिकारी, कर्मचाºयांकडून अवहेलना होत असल्याचा आरोप करून त्यांना कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाही. कार्यालयात चांगली वागणूक दिली जात नाही. तसेच राहत्या घरांचा मोबदला मिळत नसल्यामुळे तो त्वरित देण्यात यावा आदी मागण्यांसाठी जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी आणि कल्याण तालुक्यांतील शेतकºयांनी बेमुदत उपोषण करण्याचा इशारा जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांना निवेदनाद्वारे दिला आहे.समृद्धीबाधित त्रस्त शेतकºयांनी एकत्र येऊन प्रशासनाकडून होत असलेल्या अन्यायाविरोधात एल्गार पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता प्रशासनाकडून झालेली नाही.शेतकºयांनी समोर ठेवल्या मागण्या; प्रशासनात खळबळशेतकरी पारंपरिक पद्धतीचा जागरण गोंधळ घालत सामूहिक मुंडण करून उपोषणास प्रारंभ करणार आहेत. या उपोषणाद्वारे बोगस खरेदीखत त्वरित रद्द करावेत. बाधित घरांचा मोबदला त्वरित मिळावा. संबंधित तालुक्यांचे तहसीलदार, प्रांत, भूसंपादन अधिकारी आदींसह भ्रष्टाचार करणारे एमएसआरडीसीचे समन्वयक, भूमी अभिलेख, दुय्यम निबंधक आदींची नार्को टेस्ट करावी. त्यांच्या संपत्तीची ईडीकडून चौकशी करावी. त्यात दोषी आढळलेल्यांना त्वरित निलंबित करावे. समृद्धीचे दावे विशेष यंत्रणांमार्फत निकाली काढावे. शेतकºयांना अपमानास्पद वागणूक देणाºया भिवंडी प्रांताच्या भूसंपादन विभागास कारणे दाखवा नोटीस बजावण्यात यावी. शेतकºयांवरील गुन्हे मागे घेण्यात यावे आदी मागण्यांसाठी शेतकरी उपोषण करणार असल्याने खळबळ उडाली आहे.