शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पारनेरमध्ये मोठी घडामोड, निलेश लंकेंच्या कट्टर विरोधकाचा अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा
2
Virat Kohli Glenn McGrath, IND vs AUS 1st Test: विराट कोहलीवर दबाव कसा आणायचा? 'द ग्रेट' ग्लेन मॅकग्राने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना दिला 'कानमंत्र'
3
हृदयद्रावक! दुसऱ्यांच्या मुलांना वाचवण्यासाठी जीव धोक्यात घातला, पण स्वतःच्या जुळ्या मुली गमावल्या
4
मुसलमान पुरोगामी, त्यांनी उद्धव ठाकरेंची ही जागा वाचवली; अबु आझमींचा भाजपावर हल्लाबोल
5
PM मोदींच्या नावे आणखी एक उपलब्धी; नायजेरियाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मान
6
श्रीदेवीसोबत कसं होतं नातं? माधुरी दीक्षितचा खुलासा; म्हणाली, "आम्ही कधीच एकत्र..."
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'दगडा पेक्षा वीट बरी' प्रमाणे महाविकास आघाडी पेक्षा महायुती बरी; लक्ष्मण हाकेंनी स्पष्टच सांगितलं
8
"माझा मुलगा ॲनिमलमधील रणबीरसारखा", अल्लू अर्जुनचं लेकाबाबत वक्तव्य, म्हणाला- "जर मी त्याच्या आईबरोबर..."
9
'आप'ला मोठा धक्का, मंत्री कैलाश गेहलोत यांनी दिला पदाचा राजीनामा, पक्षालाही ठोकला रामराम 
10
भारताकडून हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी, मोजक्या देशांच्या यादीत मिळवलं स्थान
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : बारामतीमध्ये शरद पवारांच्या बॅगांची तपासणी; अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टरमधील साहित्याची केली तपासणी
12
अजित पवार प्रचंड जातीवादी माणूस, त्यांनी कायम...; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
13
"मणिपुर ना एक है, ना सेफ है", हिंसाचारावरून मल्लिकार्जुन खरगेंचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा
14
मुंबईमध्ये अपक्षांना थारा नाहीच! ३६ मतदारसंघांतील आकेडवारी काय सांगते?
15
मुंबई : अभिनेत्याच्या पत्नीला आला एक मेसेज; सायबर ठगाने कसा घातला गंडा?
16
मुंबईवरून आलेल्या ट्रॅव्हल्समध्ये सापडली कोट्यवधीची रक्कम, मोजदाद सुरू; पोलिसांनी ठेवला पहारा
17
"मला जेलमध्ये टाकण्याची भाषा करू नका"; एकनाथ शिंदेंनी थोपटले दंड
18
Chalisgaon Vidhan Sabha: जुन्या पक्क्या मित्रांमध्ये रंगली आहे कट्टर लढत!
19
निष्काळजीपणा की कट? रुग्णालयातील NICU वॉर्डमध्ये कशी लागली आग; समोर आला रिपोर्ट
20
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेले हे निर्णय विधानसभा निवडणुकीत ठरू शकतात गेमचेंजर

ठाण्याच्या विकासात जैन समाजाचे योगदान मोलाचे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे प्रतिपादन 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2017 8:19 PM

जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या (जितो) ठाणे शाखेतर्फे येथील मॉडेला मैदानावर रविवारी मान्यवर मुनींच्या उपस्थितीत नवकार मंत्रजपाचे आयोजन करण्यात आले होते.

ठाणे : जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशनच्या (जितो) ठाणे शाखेतर्फे येथील मॉडेला मैदानावर रविवारी मान्यवर मुनींच्या उपस्थितीत नवकार मंत्रजपाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे उपस्थित होते. ठाण्यात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा केंद्राच्या उभारणीसाठी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल मुनिवर्य जयप्रभ विजयजी (जे. पी. गुरुजी) यांनी पालकमंत्र्यांचा गौरव करताना त्यांची मुक्तकंठाने प्रशंसा केली. यावेळी ठाणे व मुलुंड परिसरातील हजारो जैनबांधव उपस्थित होते.

जितोच्या ठाणे शाखेच्या स्थापनेवेळी ठाण्यातील हाजुरी येथे अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा केंद्रासाठी तर उथळसर येथे शाळा उभारणीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन पालकमंत्र्यांनी जितोच्या पदाधिकाऱ्यांना दिले होते. आश्वासनाची पूर्तता केल्याच्या निमित्ताने रविवारी जैन समाजातील मान्यवर मुनींच्या उपस्थितीत मंत्रिमहोदयांचा गौरव करण्यात आला. यावेळी शिंदे यांच्या हस्ते वैद्यकीय सुविधा केंद्राच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले. येत्या चार महिन्यांत हे वैद्यकीय सुविधा केंद्र ठाणेकरांच्या सेवेत रुजू होणार आहे. तर ठाणे महापालिकेच्या पुढील महासभेत शाळा उभारणीच्या प्रस्तावाला हिरवा कंदील दाखवला जाईल, अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमाला ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे, आमदार रवींद्र फाटक, प्रताप सरनाईक, नरेश म्हस्के यांच्यासह ठाणे जितोचे अध्यक्ष महेंद्र जैन, जितोचे सर्व पदाधिकारी व एमसीएचआय-क्रेडाइचे ठाणे अध्यक्ष अजय आशर आदी मान्यवर उपस्थित होते.

जे. पी. गुरुजींचे गौरवोद्गार-

दरम्यान, मुनिवर्य जे. पी. गुरुजी यांनी धर्मवीर आनंद दिघे यांच्या आठवणी जागवताना शिंदे यांच्यात आनंद दिघे यांचा भास होत असल्याचे गौरवोद्गार काढले. आनंद दिघे यांचा सहकार्याचा वारसा शिंदे पुढे चालवत असल्याचे गुरुजी म्हणाले.

वैद्यकीय सुविधा केंद्रात काय?

*हजुरी येथे 1200 चौरस मीटर भूखंडावर उभारणी

*12 हजार चौरस फुटांच्या वास्तूचे बांधकाम पूर्ण

*यलिसिससारखे महागडे उपचार स्वस्तात उपलब्ध

*चार महिन्यांत कार्यान्वित होणार

ठाणे-मुलुंड परिसरातील रुग्णांसाठी उपयुक्त-

ठाणे शहराच्या विकासात जैन समाजाचे मोलाचे योगदान आहे. शांतिप्रिय असलेल्या या समाजाने ठाण्यात आतापर्यंत अनेक लोकोपयोगी कामांच्या उभारणीत सहकार्य केले असून जैन समाज माझ्यासाठी परिवारासारखाच आहे.– एकनाथ शिंदे, पालकमंत्री, ठाणे

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे