शहरं
Join us  
Trending Stories
1
मेट्रोच्या भुयारी मार्गाचे लोकार्पण नरेंद्र मोदींच्या हस्ते ऑनलाईन होणार, नवीन तारीख घोषित
2
शेतकरी नेते रविकांत तुपकरांना पोलिसांकडून अटक, आंदोलन सुरू असतानाच कारवाई
3
हिजबुल्लाहला आणखी एक धक्का, हवाई हल्ल्यात ड्रोन कमांडर ठार, इस्रायलचा दावा
4
मराठा आरक्षणासाठी पती- पत्नीने घेतले विषारी द्रव, प्रकृती चिंताजनक 
5
माझे काम पाहून धीरुभाई अन् टाटाही चकीत झाले; नितीन गडकरींनी सांगितला तो किस्सा...
6
साताऱ्यात काँग्रेसला हवा माण, वाई अन् कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ
7
छगन भुजबळांची प्रकृती बिघडली, हॉस्पिटलमध्ये दाखल; पुण्यातून विशेष विमानाने मुंबईत आणलं
8
परिवर्तन महाशक्तीच्या नेत्यांनी घेतली मनोज जरांगे पाटील यांची भेट, प्रकृतीची केली विचारपूस
9
अक्षय शिंदेचा मृतदेह ठाण्यात दफन करण्यास मनसेचा विरोध, कळवा पोलिसांना दिलं पत्र
10
देशातील पहिली एअर ट्रेन दिल्लीत सुरू होणार; जगातील कोणत्या देशांमध्ये आहे 'ही' सुविधा?
11
मनोजराव कोणालाही भेटायचे नाही, तब्यतेची काळजी घ्या; संभाजीराजेंचा मनोज जरांगे यांना सल्ला
12
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे पंतप्रधान मोदींनी फोन करून केले अभिनंदन
13
विधानसभा निवडणुकीत अजित पवार गट किती जागा जिंकणार? NCP चा इंटरनल सर्व्हे सर्वांनाच चकित करणारा!
14
264 धावा नव्हे...; रोहित शर्माच्या नावावर याहूनही एक मोठा विक्रम! मोडणे एखाद्या स्वप्नासारखे
15
बक्षिसाची रक्कम पोलीस कल्याण निधीत जमा करा, 'त्या' पोलिसांची मनसेला विनंती
16
चीनच्या नव्या अस्त्रामुळे जग चिंतेत, ही क्षेपणास्त्रंसुद्धा क्षणार्धात करू शकतात कुठलंही शहर नष्ट
17
"भाजपचे सरकार आल्यास PoK जम्मू-काश्मीरमध्ये सामील होईल", योगी आदित्यनाथ यांचे जनतेला आश्वासन
18
आता सीबीआयला तपासासाठी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागणार, कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
19
धक्कादायक! सासूचा रुग्णालयात मृत्यू; जावयाने मृतदेह घेऊन गाठली बँक, केली पैशांची मागणी...
20
"मोदी खूप शक्तिशाली आहेत, अमाप पैसा आहे, पण...", अरविंद केजरीवालांचा निशाणा

झालं झिंग झिंग झिंगाट... गाण्यावर मुलांनी धरला ठेका; माहोल सैराट झाला

By जितेंद्र कालेकर | Published: January 22, 2023 10:36 PM

मुंबई-ठाण्यातील ११०० विशेष मुलांनी लुटला ट्रायम्प रनचा आनंद

जितेंद्र कालेकरठाणे : कोणी दौडमध्ये भाग घेतलाय तर कोणी झिंग झिंग झिंगाटच्या गाण्यावर ताल धरलाय. काही जण पिज्झा आणि पावभाजीची चव चाखण्यात दंग झाले. रोटरी क्लब आॅफ ठाणे हिल्स आणि ट्रायम्प फाउंडेशनने ठाण्यात रविवारी आयोजित केलेल्या ट्रायम्प रन या विशेष मुलांसाठीच्या कार्यक्रमातील या दृश्याने विशेष मुलांच्या पालक आणि शिक्षकांनाही मोठा आनंद मिळवून दिला.

ठाण्यातील होली क्रॉस कॉन्व्हेंट हायस्कूलच्या मैदानावर आयोजित केलेल्या अनोख्या कार्यक्रमाचे उद्घाटन रोटरीचे जिल्हा प्रांतपाल कैलास जेठानी यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमात मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईतील ४० शाळांमधील ११०० विशेष मुलांनी सहभाग घेतला होता. यामध्ये १०९ कर्णबधिर तर ९०० गतिमंद आणि इतर अशा मुलांसह ३०० ते ४०० पालकांचा यात सहभाग होता.

गेल्या २२ वर्षांपासून आयोजित होत असलेल्या मेळाव्यात फन आणि एंटरटेनमेंट झोनने मुलांचे लक्ष वेधले होते. यात विशेष मुलांना खेळात सहभाग घेता येतील, अशा लहान खेळांची रेलचेल असल्याने त्यांनी याचा मनमुरादपणे आनंद घेतला. यामध्ये वयोगटानुसार मैदानी खेळ आणि स्पधार्ही घेण्यात आल्या. मार्च पासने कार्यक्रमाला सुरुवात झाली. त्यानंतर मैदानी खेळांबरोबरच टॅटू काढणे, हेअर बिडिंग, रायफल शूटिंग आणि फन झोन असे भरगच्च कार्यक्रम या ठिकाणी होते. बदलापूरच्या प्रगती अंध विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या गाण्याच्या कार्यक्रमाने चांगलीच रंगत आणली. सर्व विद्यार्थ्यांना यावेळी भेटवस्तूही देण्यात आली. रोटरीचे अध्यक्ष जयराम मेंडन, सचिव समीर लिमये, सदस्य हर्षद दिवेकर आदी बहुसंख्य स्वयंसेवकांनी उत्स्फूर्तपणे या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सहभाग घेतला होता. 

माझ्या दक्ष या दहा वर्षांच्या मुलाने या मेळाव्यातील बॉल फेकण्याच्या स्पर्धेत बक्षीस मिळविले. या कार्यक्रमाने पालक म्हणून माझाही उत्साह वाढविला.

रेश्मा कालू, पालक, ठाणे

टॅग्स :thaneठाणेStudentविद्यार्थी