उल्हासनगरात कॉंग्रेसाचे महागाई विरोधात जनजागरण अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2021 06:31 PM2021-11-15T18:31:03+5:302021-11-15T18:31:18+5:30

मोदीच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशाला व जनतेला महागाईच्या खाईत लोटले असून जनता मोदीसत्तेला उखडून टाकेल असा विश्वास यावेळी रोहित साळवी यांनी व्यक्त केला.

Janajagaran campaign of Congress against inflation in Ulhasnagar | उल्हासनगरात कॉंग्रेसाचे महागाई विरोधात जनजागरण अभियान

उल्हासनगरात कॉंग्रेसाचे महागाई विरोधात जनजागरण अभियान

Next

सदानंद नाईक 

उल्हासनगर : बालदिनाचे औचित्य साधून नेहरू चौकातून रविवार काँग्रेसने महागाई विरोधात जनजागरण आंदोलनाला सुरवात केली. शहरजिल्हाध्यक्ष रोहित साळवे यांनी मोदी सरकारच्या ध्येय धोरणावर टीका करून नागरिक महागाई मुळे हैराण झाल्याचे सांगितले. 

उल्हासनगर काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली १४ ते २९ नोव्हेंबर दरम्यान संपूर्ण राज्यात भाजपा सरकारच्या महागाई विरोधात लोकांमध्ये जनजागृती अभियान राबविणार आहे. या अभियानाची सुरुवात उल्हासनगर प्रभारी उमाकांत अग्निहोत्री, सहप्रभारी मनोज शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शहाराध्यक्ष रोहित साळवे यांच्या उपस्थितीत रविवारी दुपारी नेहरू चौक येथे करण्यात आली. नेहरू चौक ते गोल मैदान व गोल मैदान ते हिरा मेरेज हॉल या दरम्यान पदयात्रा काढून देशात असलेल्या महागाई विषयी नागरिकांना माहिती दिली. तसेच येणाऱ्या काळात भाजपला निवडणुकीत हरवून देशाच्या हितासाठी काँग्रेस पक्षाला निवडून देण्याचे आवाहन जनतेला केले. 

मोदीच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने देशाला व जनतेला महागाईच्या खाईत लोटले असून जनता मोदीसत्तेला उखडून टाकेल असा विश्वास यावेळी रोहित साळवी यांनी व्यक्त केला. जनजागरण अभियान यात्रेत काँग्रेस पदाधिकारी अनिल राजवानी यांच्या कार्यालयात काही जणांनी पक्षात प्रवेश केला. अभियान यात्रेत पक्षाचे कार्याध्यक्ष मोहन साधवानी, ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके, महादेव शेलार, मुन्ना श्रीवास्तव, विशाल सोनवणे, अमर जोशी, सुशील सैनी, फजल शेख यांच्यासह पक्षाच्या विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित

Web Title: Janajagaran campaign of Congress against inflation in Ulhasnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.