ठाणे: ठाणे जिल्ह्यातील प्रसिद्ध असलेली ठाणे पूर्वेकडील कोपरीगावची आराध्य देवता गावदेवी (चिखलादेवी) जत्रौत्सव व पालखी सोहळा १ व २ जानेवारी २०१८ रोजी संपन्न होत आहे. १ जानेवारी रोजी पालखी सोहळा व २ जानेवारी रोजी जत्रौत्सव ठाणे पुर्वेत संपन्न होणार आहे अशी माहिती गावदेवी सेवा मंडळाचे अध्यक्ष दिलीप पाटील यांनी गुरूवारी पत्रकार परिषदेत दिली. संपूर्ण महाराष्ट्रात पौष पौर्णिमेला जत्रा व पालखी सोहळा सुरू होता. या सोहळयात दरवर्षी ठाणे पुर्वेकडील आई गावदेवी (चिखलादेवी) मातेचा पालखी सोहळ््यास दरवर्षी पहिला मान मिळतो व त्यानंतर महाराष्ट्रातील पालखी व जत्रौत्सवास सुरूवात होते. मोठ्या थाटामाटात हा सोहळा ठाणे पुर्वेकडील कोपरीगावातील गावदेवी सेवा मंडळ व ग्रामस्थ मंडळी साजरा करतात. या जत्रौत्सवाचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून साजरा करत आहेत तर पालखी सोहळ््यास यंदाचे हे ११ वे वर्ष आहे. कोपरी गावातील ग्रामस्थ मंडळे हा सोहळा पार पाडण्यासाठी दोन महिने अगोदर पुर्व तयारी करतात. संपूर्ण ठाणे जिल्ह्यातून या गावदेवी (चिखलादेवी) मातेचे दर्शन घेण्यासाठी यावेळी हजेरी लावतात. तब्बल दोन लाखांहून अधिक भाविक या मंदिरात दर्शन घेण्यासाठी येत असतात. या मंदिरावर या दिवशी विविध छटांची रोषणाई केली जाते तर दरवर्षी या मंदिरास रंगविले जाते. देवीच्या गाभाºयात या दोन दिवसांत सप्तरंगी फुलांनी व रोषणाई सजविले जाते. १ जानेवारी रोजी या मंदिरातून दुपारी मोठ्या उत्सवात पालखी सोहळा सुरू होतो व ही पालखी संपूर्ण ठाणे पुर्वमध्ये कोपरीगावात फिरुन परत रात्री याच मंदिरात विसर्जन होते. या पालखी सोहळ््यात लेझीम, ढोल रथक, भजनीमंडळी, विविध वेशभूषाकार सहभागी होणार आहे. यंदाच्या सोहळ््यात महाविद्यालयीन विद्यार्थी नऊवारी साडीत बुलेट चालविणार आहेत.या सोहळ््याचा दुसरा दिवस हा जत्रौत्सवाचा असून यावेळी मंडळचे अध्यक्ष पाटील पत्नीसह पालखी झाल्यावर रात्री १२ वाजता देवीचे अभिषेक व पूजा करणार आहेत. त्यानंतर पहाटे तीन वाजल्यापासून भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुले होणार आहे. या वर्षी सोहळ््यात महिला लाल रंगाच्या तर पुरूष पांढºया रंगाचे कपडे परिधान करणार आहेत.
जानेवारीमध्ये ठाणे पुर्वेत गावदेवी जत्रौत्सव व पालखी सोहळा, जत्रौत्सवाचा पहिला मान कोपरीकरांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 3:55 PM
दरवर्षी प्रमाणे यंदाही पौष पौर्णिमेला ठाण्यातील सुप्रसिद्ध गावदेवी मातेचा जत्रौत्सव व पालखी सोहळा पार पडणार आहे. या जत्रौत्सवाचा पहिला मान कोपरीकरांना मिळणार आहे.
ठळक मुद्देजानेवारीमध्ये ठाणे पुर्वेत गावदेवी जत्रौत्सव व पालखी सोहळाजत्रौत्सवाचा पहिला मान कोपरीकरांनामहाविद्यालयीन विद्यार्थी नऊवारी साडीत बुलेट चालविणार