शहरं
Join us  
Trending Stories
1
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
2
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
3
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
4
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
5
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
6
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
7
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
8
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
9
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
10
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
11
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
12
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
13
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
14
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
15
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
16
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
17
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
18
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
19
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
20
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील

जव्हार, विक्रमगडला पावसाने झोडपले

By admin | Published: June 02, 2017 4:55 AM

गुरुवारी वरूणराजाने जव्हार, विक्रमगड, मनोरला झोडपून काढले. ७ जूनला हजेरी लावणरा पाऊस जूनच्या पहिल्या तारखेलाच

हुसेन मेमन / लोकमत न्यूज नेटवर्कजव्हार : गुरुवारी वरूणराजाने जव्हार, विक्रमगड, मनोरला झोडपून काढले. ७ जूनला हजेरी लावणरा पाऊस जूनच्या पहिल्या तारखेलाच ढगांच्या गडगडाटासह दुपारी ४ च्या सुमारास बरसल्याने जव्हार शहरात सर्वत्र दाणादाण उडाली. दुपार पर्यत उन्हाचा कडका इतका जोरात होता की, लोक पाऊस कधी पडेल याची वाट बघत होते, मात्र दुपारी पावसाने जोर पकडून अचानक वर्षाव केला व ठिकठिकाणी पत्र्यांच्या, कौलांच्या, कुडामातीच्या घरांवर प्लॅस्टीक टाकण्याची गडबड सुरू झाली. दरम्यान बालचमूंनी पहिल्या पावसात भिजण्याचा मनसोक्त आनंद लुटला. बघता बघता नाले, गटारे, रस्ते वाहू लागले, अचानक पडलेल्या पावसामुळे मोटारसायकलस्वार व पादचाऱ्यांचे छत्री व रेनकोट नसल्यामुळे मोठे हाल झाले. थोड्याच वेळात शहरात आल्हाददायक वातवरण निर्माण होऊन गारवा निर्माण झाला. मात्र नेहमीप्रमाणे पाऊस सुरू होताच वीज गुल झाली. त्यामुळेही हाल झाले. पावसाची संततधार तासाभर सुरू होती. पालघर जिल्ह्यातील सुप्रसिध्द थंड हवेचे ठिकाण म्हणून जव्हारचा खास उल्लेख करण्यात येतो. निसर्गाचे वरदान लाभलेल्या या गावाची अनेक वैशिष्ट्ये आहेत. या परिसरात अनेक धबधबे आहेत. तालुक्याच्या आजूबाजूला दाभोसा धबधबा, काळमांडवी सारखे मोठे मोठे धबधबे असल्यामुळे येथे दरवर्षी पाऊस सुरू झाल्यावर पर्यटकांची गर्दी होते.विक्र मगडमध्ये ; वादळी वारे-विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊसविक्र मगड : केरळ मधे मान्सूनचे आगमन झाल्याच्या पाठोपाठ गुरूवारी विक्र मगड मध्ये जोरदार वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने दणका दिल्याने बेसावध असलेल्या नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. पाऊस ७ जून नंतर येणार या समजात असलेल्या अनेकांनी आपल्या घरांची शाकारणी, कौले चाळणे, डांबर भरणे, प्लॅस्टिक अंथरणे अशी कामे केलेली नव्हती. त्यांची आज एकच धांदल उडाली. मात्र या पावसाचा आगमनाने शेतकरी वर्ग आनंदीत झाला आहे. गेली दोन वर्षे अनियमित बरसणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे हाल झाले होते. परंतु या वर्षी मान्सूनने वेळेत बरसण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे पुढचे चार महीने देखील अशीच परिस्थिती राहावी, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. वादळी वाऱ्यासह अचानक मुसळधार कोसळलेल्या पावसामुळे वीटभट्टी व्यावसाईक, गवतपावली व्यावसायिक याचा माल भिजला. ही बाब त्यांचासाठी चिंतेची ठरली आहे. तर निसर्गाच्या लहरीपणामुळे लांबलेल्या आंबा हंगामामुळे बागायतदारांना मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.पावसामुळे हवेत गरवा निर्माण झाल्याने उन व उकाड्याने त्रासलेल्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तर पावसाचे आगमन होताच महावितरणचा भोंगळ कारभार सुरु झाला असून वारंवार वीज खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे.