शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
6
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
7
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
8
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
9
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
10
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
11
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
12
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
13
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
14
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
15
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
16
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
17
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
18
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
19
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल
20
"नियोजनाप्रमाणे प्रचार केला नाही"; काँग्रेस नेत्याने शरद पवार-ठाकरेंवर फोडलं पराभवाचे खापर

जीन्स कारखान्यांची सुरू होणार उल्हासनगरात धडधड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 5:50 AM

पंचम कलानी : ईटीपी प्लांट बसवणाऱ्यांना देणार परवानगी

उल्हासनगर : जीन्स कारखान्यांना ईटीपी प्लांट बसवण्याची परवानगी प्रदूषण मंडळाने दिल्याने कारखान्यांची धडधड पुन्हा सुरू होईल, असे महापौर पंचम कलानी यांनी सांगितले. जीन्स कारखान्यांतील सांडपाण्यामुळे वालधुनी नदी प्रदूषित झाल्याचा ठपका ठेवत महापालिकेने जीन्स कारखान्यांवर कारवाई केली होती. यामुळे हजारो कामगार बेरोजगार झाले होते.

उल्हासनगरमध्ये देशातील दुसºया नंबरचा जीन्स उद्योग भरभराटीला आला आहे. ५० हजारांपेक्षा जास्त कामगार काम करत असून कोट्यवधींची उलाढाल होते. मात्र, मध्यंतरी उल्हास, वालधुनी नदी प्रदूषित झाल्याप्रकरणी एका पर्यावरणप्रेमी संस्थेने न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. नदीला प्रदूषित करणाºया नदीकाठच्या कारखान्यांवर कारवाई करण्याचा आदेश न्यायालयाने महापालिकेला दिला. त्यानुसार, उल्हासनगर पालिकेने जीन्स कारखान्यांवर कारवाई करून ते बंद केले. या कारवाईने कामगार बेकार झाले. विनापरवाना सुरू असलेल्या जीन्स वॉश कारखान्यांवर गंडांतर आल्यावर जीन्स कारखानदारांनी मुख्यमंत्र्यांसह स्थानिक नेत्यांना साकडे घातले. जीन्स कारखान्यांनी स्वत:चा ईटीपी प्लांट उभारावा, असा सल्ला प्रदूषण मंडळाने दिला. जे कारखानदार असा प्लांट उभारतील, त्यांनाच मंडळ जीन्स कारखाने सुरू करण्याची परवानगी देईल, असे मंडळातर्फे सांगण्यात आले.दोन कारखानदारांनी प्लांट उभारून प्रदूषण मंडळाची एनओसी आणली आहे. मंडळाने एनओसी दिली असली तरी ‘निरी’ संस्थेकडून प्लांटबाबत रीतसर परवानगी घेणे गरजेचे असल्याचे मत प्रदूषण मंडळाच्या अधिकाºयांना दिले. ‘निरी’ संस्थेने ईटीपी प्लांटबाबत परवानगी दिल्यावर कारखाने सुरू होतील, असा विश्वास महापौर कलानी यांनी व्यक्त केला. एकूण ५८ जीन्स कारखानदारांनी प्लांट उभारण्याची तयारी दर्शवली आहे.महापौरांच्या हस्ते पत्रजीन्स कारखानदारांनी महापौर पंचम कलानी यांची गुरुवारी भेट घेऊन प्रदूषण मंडळाकडून जीन्स कारखान्यांच्या ईटीपी प्लांटला मिळालेल्या एनओसीची माहिती दिली.सांडपाणी थेट नदीत सोडण्याऐवजी प्लांटमध्ये प्रक्रिया करून सोडले जाणार आहे. मंडळाच्या एनओसीनंतर ‘निरी’ संस्थेचीही एनओसी घ्यावी लागणार आहे.महापौर कलानी यांच्या हस्ते मंडळाने दिलेली एनओसी कारखानदारांना देण्यात आली. यावेळी ओमी कलानी, सभागृह नेते जमनुदास पुरस्वानी, प्रकाश माखिजा, आयुक्त गणेश पाटील आदी उपस्थित होते. पालिका, प्रदूषण मंडळाने उचललेल्या सकारात्मक पावलाचे कारखानदारांनी स्वागत केले असून पुन्हा उद्योगनगरी गजबजणार आहे. 

टॅग्स :ulhasnagarउल्हासनगर