ठाणे : आठ तोळ्यांच्या सोन्याच्या हारामध्ये केवळ १.४० ग्रॅम सोने वापरून उर्वरित तांबे आणि झिंकची भेसळ करून ग्राहकाची फसवणूक करणा-या प्रसन्त भेरा (३८) या चितळसर मानपाडा येथील सराफाला कापूरबावडी पोलिसांनी रविवारी अटक केली आहे. त्याला तीन दिवस पोलीस कोठडी मिळाली आहे.नवी मुंबईतील दिघा येथे राहणा-या दिलीप गुप्ता या टेम्पोचालकाने पाच महिन्यांपूर्वी ठाण्यातील चितळसर मानपाडा येथील भेरा यांच्या ‘आरती ज्वेलर्स’ या दुकानातून आठ तोळ्यांचा सोन्याचा हार बनविला होता. सुरुवातीला त्यांनी त्याचे एक लाख रुपये दिले होते. उर्वरित रक्कम ते दर महिन्याला टप्याटप्याने देत होते. एका कार्यक्रमामध्ये त्यांच्या पत्नीला या हाराबद्दल कोणीतरी शंका व्यक्त केल्यानंतर त्याच्या शुद्धतेची त्यांनी पडताळणी केली. तेंव्हा यामध्ये तांबे आणि झिंक मिश्रित केल्याचे आढळले. आठ तोळ्यांचे सोने सांगून यामध्ये त्याने केवळ १.४० ग्रॅम सोने वापरले होते. भेरा हे चांगल्या प्रकारचे सोन्याचे दागिने काही हप्त्यांवर देतात, असे समजल्यामुळे गुप्ता दाम्पत्याने त्याच्याकडे एक लाखांची गुंतवणूक केली होती. संपूर्ण पैसे भरले गेल्यानंतरच हा कथित सोन्याचा हार त्याच्याकडून त्यांनी ताब्यात घेतला. परंतु, आपली फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात २ डिसेंबर २०१८ रोजी गुन्हा दाखल केला. ही गुन्हा दाखल होताच भेराला अटक केली आहे. त्याने आणखीही कोणाची फसवणूक केली आहे का? या सर्व बाबींचा तपास करण्यात येत असल्याचे कापूरबावडी पोलिसांनी सांगितले. सहायक पोलीस निरीक्षक बी. सी. वंजारे हे अधिक तपास करीत आहेत.
भेसळीचे सोने विकणाऱ्या सराफाला ठाण्यात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2018 8:58 PM
सोन्यामध्ये तांबे आणि झिंकची भेसळ करुन आठ तोळयाच्या हारामध्ये केवळ १.४० ग्रॅमचे सोने देऊन नवी मुंबईच्या दिलीप गुप्ता या टेम्पो चालक ग्राहकाची फसवणूक करणाºया ठाण्यातील प्रसन्त भेरा या सराफाला कापूरबावडी पोलिसांनी अटक केली आहे.
ठळक मुद्दे आठ तोळयामध्ये १.४० ग्रॅमचा सोन्याचा मुलाचादोन लाखांमध्ये विकले बनावट सोनेकापूरबावडी पोलिसांची कारवाई