मुंब्रा - काही दिवसांपूर्वी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी औरंगजेबाबाबत काढलेल्या आक्षेपार्ह उद्गारांमुळे त्यांच्या मतदारसंघातील मुस्लीम कार्यकर्ते आणि नागरिकांत नाराजी हाेती. या वादावर साेमवारी पडदा टाकताना औरंगजेबाचे नाव न घेता मी इतिहासासंदर्भात बोललो होताे. कुठल्याही धर्माबाबत कधीही बोलत नाही. मात्र, माझ्या वक्तव्याचा धर्माशी काही संबंध असेल तर ‘मैं साॅरी कह सकता हूं’ असे सांगितले.
या वक्तव्याबाबत माफी न मागितल्यास आगामी महापालिका तसेच विधानसभा निवडणुकीत त्याचा राजकीय फटका बसू शकतो, असा इशारा काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काॅंग्रेसचे प्रदेश सचिव सय्यद अली अशरफ यांनी दिला होता. याबाबत सोमवारी पत्रकारांनी त्यांना विचारलेल्या प्रश्नावेळी त्यांनी नरमाई घेत खुलासा करून ही नाराजी शांत करण्याचा प्रयत्न केला.