जितेंद्र आव्हाड यांचा, अर्थाचा अनर्थ करण्याचा स्थायीभाव- आनंद परांजपे

By अजित मांडके | Published: February 5, 2024 04:03 PM2024-02-05T16:03:01+5:302024-02-05T16:03:24+5:30

अजित पवारांवर केलेल्या टीकेनंतर आनंद परांजपेंकडून पलटवार

Jitendra Awad's Permanence of Destruction of Meaning - Anand Paranjape | जितेंद्र आव्हाड यांचा, अर्थाचा अनर्थ करण्याचा स्थायीभाव- आनंद परांजपे

जितेंद्र आव्हाड यांचा, अर्थाचा अनर्थ करण्याचा स्थायीभाव- आनंद परांजपे

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: महाराष्ट्राच्या विकासासासाठी ३५ वर्षे समर्पित असलेल्या अजित पवार यांच्यावर टीका करुन अर्थाचा अनर्थ करण्याचा आपला स्थायीभाव असल्याचे जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा दाखवून दिल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला.

अजित पवार यांनी बारामती येथे बोलताना भावनिक न होता विकासासाठी मतदान करा, अशा अर्थाचे वक्तव्य केले होते. पण अर्थाचा अनर्थ करण्याचा स्थायीभाव असलेल्या आव्हाड यांनी, श्रद्धेय शरद पवार यांच्या मृत्यूबाबत विधान करुन, ध चा मा करत, खोटे बोल पण रेटून बोल अशापद्धतीने अजित पवार यांच्यावर टीका केली. मुळात  शरद पवार यांच्या निरोगी आरोग्याची आम्ही नेहमी कामना करत असतो. त्यांनी कृषी मंत्री म्हणून देशात केलेल्या कार्याचे कौतुक आहेच त्याचबरोबर गेली ३५ वर्षे महाराष्ट्राच्या विकासासाठी समर्पित असलेल्या अजित पवार याना  २८८ मतदारसंघातील लोकांमध्ये आदराची भावना कायम आहे.

छगन भुजबळ यांच्या राजीनाम्यावरुन टीका करणाऱ्या आव्हाड यांच्यावर रिदा रशीद या महिलेवरील विनयभंगाच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल झाल्यावर उद्वेगाने राजीनामा देताना आव्हाड यांनी आपला राजीनामा सभापती किंवा उपसभापती नरहरी झिरवळ यांच्याकडे न देता तो प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे दिला होता, हे ते सोईस्कर विसरलेले दिसतात, असा टोला हि त्यांनी लगावला.

Web Title: Jitendra Awad's Permanence of Destruction of Meaning - Anand Paranjape

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.