शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
5
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
6
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
7
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
8
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
9
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
10
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
11
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
12
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
13
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
14
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
15
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
16
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
17
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
18
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
19
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
20
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

अभियंता मारहाणप्रकरणी जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि सुटका

By जितेंद्र कालेकर | Updated: October 14, 2021 23:09 IST

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या अनंत करमुसे याअभियंत्यास मारहाण केल्याप्रकरणी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना गुरु वारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ठाण्याच्या वर्तकनगर पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्दे दीड वर्षांपूर्वी झाली होती अनंत करमुसे यांना मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करणाऱ्या अनंत करमुसे याअभियंत्यास मारहाण केल्याप्रकरणी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना गुरु वारी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास ठाण्याच्या वर्तकनगर पोलिसांनी अटक केली. त्यांची दहा हजारांच्या जातमुचलक्यावर तसेच पोलिसांना तपासात सहकार्य करण्याच्या अटीवर ठाणे न्यायालयाने त्यांची ५.३० ते ६ वाजण्याच्या सुमारास जामीनावर सुटका केली आहे.स्थापत्य अभियंता करमुसे यांनी फेसबूकवर आव्हाड यांचा आक्षेपार्ह फोटो गतवर्षी व्हायरल केला होता. त्यानंतर काही पोलीस करमुसे यांच्या घरी पोहोचले. पोलीस ठाण्यात जायचे असल्याचे सांगून त्यांनी करमुसे यांना वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आव्हाड यांच्या बंगल्यावर नेले. तिथे आपणास १० ते १५ जणांनी पोलिसांच्या लाठीने बेदम मारहाण केल्याचा आरोप करमुसे यांनी केला होता. हा प्रकार आव्हाडांच्या उपस्थितीत घडल्याचा आरोप करमुसे यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळ ढवळून निघाले. विरोधकांकडून दबाव आल्यानंतर वर्तकनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. याप्रकरणी मुंबई सुरक्षा दलातील तीन पोलीस कर्मचाऱ्यांसह १० ते १२ आरोपींना अटकही झाली होती. ५ एप्रिल २०२० मध्ये हा प्रकार घडला होता. याच गुन्ह्यात जितेंद्र आव्हाड गुरु वारी दुपारी वर्तकनगर पोलीस ठाण्यात हजर झाले. पोलिसांनी जबाब नोंदविल्यानंतर त्यांना ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायालयासमोर हजर केले. न्यायाधीश डी. डी. कोळपेकर यांनी त्यांची जामीनावर सुटका केली. दरम्यान, त्यांच्या सुटकेनंतर भाजपनं मात्र मंत्रिमंडळातून त्यांच्या बडतर्फीची मागणी केली आहे.* एकीकडे त्यांच्या हस्ते गुरुवारी म्हाडाच्या घरांची सोडत पार पडली असताना दुसरीकडे त्यांना अटक झाल्याने महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. ही बाब भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विट करून समोर आणली. ठाणे पोलिसांकडून याबाबत अधिकृत कोणतीही माहिती उशिरापर्यंत देण्यात आली नाही. एका वरिष्ठ पोलीस अधिकाºयाने नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर या वृत्ताला दुजोरा दिला.

टॅग्स :thaneठाणेCrime Newsगुन्हेगारी