शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
6
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
7
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
8
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
9
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
10
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
11
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
12
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
13
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
14
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
15
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
16
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
17
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
18
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
19
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
20
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध

जितेंद्र आव्हाडांचे डाव ‘खरे’ झाले

By admin | Published: January 20, 2016 1:55 AM

बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्येवरून अडचणीत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका गटाने पक्षश्रेष्ठींवर दबाव टाकण्याची खेळलेली खेळी यशस्वी झाली आहे.

ठाणे : बिल्डर सूरज परमार यांच्या आत्महत्येवरून अडचणीत आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील एका गटाने पक्षश्रेष्ठींवर दबाव टाकण्याची खेळलेली खेळी यशस्वी झाली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या इशाऱ्यावरून आक्रमक झालेल्या नगरसेवकांच्या पाठीशी उभे राहण्याचे आश्वासन पक्षाने दिल्याने येत्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीवर आव्हाड गटाचा वरचष्मा असेल, असे संकेत प्राप्त झाले आहेत.आव्हाड गटाच्या नगरसेवकांना बळ मिळाल्याने दुसरा गट हताश झाला असून नाराज नगरसेवकांपुढे राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी लोटांगण घालण्याची गरज नव्हती, अशा शब्दांत नाराजी प्रकट केली. पक्षाचा पाठिंबा मिळवणे हे निमित्त असून प्रत्यक्षात महापालिका निवडणुकीवर डोळा ठेवून स्वत:चे प्राबल्य वाढवण्याचा आव्हाड गटाचा हेतू सफल झाल्याचे विरोधी गटातील नगरसेवकांचे मत आहे. परमार प्रकरणात सध्या अटकेत असलेले माजी विरोधी पक्षनेते हणमंत जगदाळे आणि नजीब मुल्ला हे जामीनसाठी झगडत आहेत. पक्षाने त्यांना या अडचणीतून सोडवावे यासाठी ठाणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसमधील आव्हाड गटाने श्रेष्ठींवर दबाव आणण्यासाठी काही दिवसापासून खेळी सुरु केली होती. पक्षश्रेष्ठींकडे वारंवार चर्चा करण्याचा प्रयत्न करुनही त्यांच्याकडून वेळ मिळत नसल्याने या नाराजांनी आपली ताकद दाखविण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बोलावलेल्या बैठकीला २४ नगरसेवकांनी जाणुनबुजून दांडी मारली होती. पक्षाच्या मागील आठवड्यात झालेल्या बैठकीत राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी परमार प्रकरणातील नगरसेवकांच्या मागे पक्ष खंबीरपणे उभा राहील, असे स्पष्ट केले. त्यानंतर मंगळवारी मुंबईतील राष्ट्रवादी भवन येथे सर्व नगरसेवकांची बैठक आयोजित केली होती. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, अजित पवार, छगन भुजबळ, विधान परिषदेचे उपसभापती वंसत डावखरे, गणेश नाईक, संजीव नाईक, हेमंत टकले आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित होते. दुपारी तीन वाजता या बैठकीला सुरवात झाली. एक तासाच्या आतच ही बैठक सुंपष्टात आली. या बैठकीला सुमारे ३४ पैकी २४ नगरसेवक उपस्थित होते. तीन नगरसेवक हे परदेश दौऱ्यावर असल्याने ते येऊ शकले नाहीत. तर काहींनी कामानिमित्त बाहेर असल्याने बैठकीला हजर राहू शकत नसल्याचे कळवले होते.दरम्यान, या बैठकीत तटकरे यांनी आपण एका परिवारासारखे असल्याने परिवारातील कोणत्याही नगरसेवकाला अडचण आली तर त्या नगरसेवकाच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे आश्वासन दिले. तसेच अटकेत असलेल्या नगरसेवकांसंदर्भातही मुख्यमंत्र्यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. अजित पवार यांनी देखील आम्ही सदैव तुमच्या पाठीशी असल्याची ग्वाही दिली. श्रेष्ठींनी आपली दखल घेतल्याने अखेर नाराज नगरसेवकांनी आपल्या तलवारी म्यान केल्या. वेगवेगळ््या घोटाळ््यांच्या आरोपांमुळे माजी मंत्री छगन भुजबळ हे अडचणीत सापडले आहेत. परमार प्रकरणावरून आव्हाड यांनाही घेरण्याचे प्रयत्न सत्ताधारी भाजपा करीत असून त्याला राष्ट्रवादीतील आव्हाड विरोधकांची फूस आहे. परमार प्रकरणावरून आव्हाड यांनाही घेरण्याचे प्रयत्न सत्ताधारी भाजपा करीत असून त्याला राष्ट्रवादीतील आव्हाड विरोधकांची फूस आहे.पवार यांनी दिलेले पाठिंब्याचे संकेत, प्रदेशाध्यक्ष तटकरे यांनी तात्काळ बैठक बोलावण्याची केलेली हालचाल व पक्षाने अडचणीतील नगरसेवकांना देऊ केलेला पाठिंबा हा घटनाक्रम आव्हाड यांना दिलासा देणारा आहे.