शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

बांधकाम क्षेत्राला जिझियाकराचा विळखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 1:20 AM

मेट्रो सुरू होण्यापूर्वीच विकासकांना दोन टक्के सेस, तर घरनोंदणी करणाºयांना

जितेंद्र मेहताअगोदर एलबीटी, त्यानंतर जीएसटी यामुळे विकासकांचे कंबरडे मोडले आहे. आता मेट्रो सुरू होण्यापूर्वीच विकासकांना दोन टक्के सेस, तर घरनोंदणी करणाऱ्यांना एक टक्का रक्कम मुद्रांक शुल्कावर भरावी लागत आहे. घरखरेदी करणाऱ्यांनाच हा भुर्दंड सोसावा लागणार असला, तरी विकासकांना मोठ्या मंदीच्या सावटाला सामोरे जावे लागत आहे, आधीच विविध करांनी विकासक मेटाकुटीला आले असताना या नव्या करामुळे ठाणे शहरात नवीन प्रकल्प सुरू होण्याची संख्या घटली आहे. मागील वर्षभरात बुकिंगवरही त्याचा परिणाम झाला असून १०० फ्लॅटमागे केवळ ६० ते ६५ फ्लॅटचे बुकिंग सुरू आहे. त्यामुळे या जिझियाकरातून मोकळे कधी होणार, असा प्रश्न आता आम्हा विकासकांना पडला आहे.

मेट्रो सुरू होण्यापूर्वीच विकासकांना दोन टक्के सेस, तर घरनोंदणी करणाºयांना एक टक्का रक्कम मुद्रांक शुल्कावर भरावी लागत आहे. ठाण्यात मेट्रोचा भार हा येथे प्रकल्प सुरू होण्यापूर्वीच विकासकांवर बसला आहे. २०१६ पासून हा मेट्रोकर विकासकांना भरावा लागत आहे. परंतु, अद्यापही मेट्रो सुरू झालेली नाही. यापूर्वी ठाण्यात एलबीटीसारखा कर होता. त्यानंतर, तो रद्द होऊन जीएसटी लागू झाला आहे. तसेच रेरा कायद्यानेदेखील विकासकांचे नुकसान झाले आहे. जीएसटीमुळे या क्षेत्रावर मंदीचे सावट पसरले आहे. त्यामुळे मागील तीन ते चार वर्षांपासून इमारती उभ्या असल्या, तरी त्यातील सर्वच फ्लॅट विकले जातात, असे नाही. मागील वर्षी ठाणे शहरात १५ ते २० हजार फ्लॅटची विक्री झाली होती. परंतु, त्यात यंदा घट झाली आहे, फ्लॅटची विक्री रोडावली आहे. १०० फ्लॅटपैकी ६० ते ६५ फ्लॅटची विक्री होते. शहरात मागील काही वर्षांत नवीन ३०० च्या आसपास प्रकल्प सुरू आहेत. मात्र, फ्लॅटची विक्री २५ ते ३० टक्क्यांनी घटली आहे. जमिनीचे भाव वाढलेले आहेत. ज्यावेळेस काही विकासकांनी जमिनी घेतल्या, त्यावेळेस भाव कमी होते, परंतु मागील काही वर्षांत जमिनींचे भाव वधारले आहेत. इतर साहित्याच्या किमती वाढलेल्या आहेत. कामगारांचे पगार वाढलेले आहेत. त्यामुळे साहजिकच फ्लॅटचे दरही वाढलेले आहेत. आता जी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे दरही आटोक्यात आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. परंतु, असे असले तरी ते विकासकांना परवडणारे नाही. एकामागून एक विविध स्वरूपाचे जिझियाकर लावले जात असल्यानेच फ्लॅट तयार असूनही ते पडून आहेत. दुसरीकडे ग्राहकांची संख्याही रोडावली आहे. त्यासाठी विविध स्कीमही राबविल्या जात आहेत. मात्र, वाढलेल्या करांमुळे ग्राहकालाही फ्लॅट घेताना विचार करावा लागत आहे. या करांबाबत वारंवार संबंधित यंत्रणांकडे पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, त्यांच्याकडून अपेक्षित असा प्रतिसाद मिळालेला नाही.

(एमसीएचआयचे उपाध्यक्ष ) 

टॅग्स :thaneठाणे