ठाणे : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात शिवसेनेत (एकनाथ शिंदे गट) संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. ठाण्यातील आनंद आश्रमासमोर शनिवारी शिवसेना महिला आघाडी आणि युवासेनेच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारत लाथा मारत आपला संताप व्यक्त केला. संजय राऊत यांची खासदारकी रद्द करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे शिवसैनिकांनी यावेळी केली.
ठाण्यात संतप्त युवसैनिकांनी शॉचालयात लावले संजय राऊतांचे फोटो... -संजय राऊत यांनी केलेल्या कृत्यानंतर शिवसैनिकात संतापाची लाट उसळली आहे. त्याचे पडसाद शनिवारी ठाण्यात दिसून आले. आनंद आश्रम येथे युवा सेना महिला आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी संतप्त झालेल्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी टेंभी नाका येथील शौचालयात संजय राऊत यांचे फोटो लावत आपला राग व्यक्त केला. जोडे मारो आंदोलन झाल्या नंतर युवसैनिकांच्या एक गटाने आक्रमक पवित्रा घेत परिसरतील सर्व सार्वजनिक शौचालयात जात त्याठिकाणी राऊत यांचे फोटो लावले आणि त्याच्या निषेधाच्या पाट्याही लावल्या.
दुसरीकडे शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी देखील राऊत यांच्याविषयी संताप व्यक्त करीत टिका केली आहे. थुंका तुम्ही, भुंका तुम्ही परिणाम पण भोगा तुम्ही, हीच तुमची कुवत हीच तुमची वृत्ती तुमच भविष्य ठरणारे आहे, तुमची प्रत्येक कृती अशा शब्दात त्यांनी टिका केली आहे. आज पण एक मावळा विचारांचा पाईक होईल तुमच्या कर्माची फळं, मिळायला सुरवात होईल, आज तुम्ही थुंका त्यांच्यावर लोकही आता थुंकतायत तुमच्यार पण लक्षात ठेवा कर्माचे फळ मिळतेच प्रत्येकाला असेही त्यांनी सांगितले.