डोंबिवली : ऊर्जाच्या फाऊंडेशनच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना डोंबिवली ,कल्याण, ठाणे, मुलूंड, तसेच शहाड, अंबरनाथ, बदलापुर, भांडुप, चेंबुर, बोरिवली, कांदिवली, येथील सुजाण नागरिकांकडुन वाढता प्रतिसाद व पाठिंबा मिळत आहे. ऊर्जा फाउंडेंशने रुद्र एन्व्हरॉन्मेंटल बरोबर इको फ्रेंडली पध्दतीने सुरू केलेल्या प्लास्टिक विघटनाच्या कार्यात कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, केशव सीता मेमोरियल फाउंडेशन ट्रस्ट यांचा मोलाचा सहभाग आहे.
ऊर्जाच्या फाउंडेशनचा १३वा ड्राइव्ह रविवार दिनांक २१ जानेवारी राेजी केबी वीरा स्कुल, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका अॉफीसमागील गल्लीमध्ये व ठाण्याला इटर्नीटी कॉमप्लेक्स सर्वीस रोड येथे सकाळी १० ते ११.३० या वेळेत आहे. 'माझा प्लास्टिक कचरा ही माझी जबाबदारी' चळवळीला अनेक नागरिक, स्वयंसेवक तसेच सहभागी कार्यकर्ते, हितचिंतक यांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.
आत्तापर्यंत उर्जा फाउंडेशनने १२ सत्रांमध्ये गेल्या वर्षभरात डाेंबिवली व ठाणे येथुन २२ टन प्लास्टिक कचरा जमा करून जेजुरी येथे पाठविला. मुंबई , ठाणे, डोंबिवली व जवळील अनेक उपनगरे येथुन प्लास्टिक कचरा येत आहे. या प्लास्टिक कचऱ्यापासून जेजुरी येथे रूद्र एन्व्हिरॉन्मेंटल सेाल्युशन्स कंपनीमार्फत इको फ्रेंडली पध्दतीने पॉलीफ्युल तयार करण्यात येते.
गेल्या ३ वर्षांपासून ऊर्जा फाउंडेशन प्लास्टिक कचरा कमी करणे तसेच वापरलेल्या प्लास्टिकचा पुनर्वापर व पुनःप्रक्रिया करण्यासाठी काम करत आहे. माझा प्लास्टिक कचरा ही माझी जबाबदारी ह्या माेहीमेत शहरातील सोसायट्यांमध्ये , तसेच शाळा , महाविद्यालये आणि इतर निवासी संकुलांमध्ये जाऊन उर्जाच्या सदस्या याविषयी जनजागृती करतात व वापरलेले प्लास्टिक कचऱ्यात न टाकता दर महिन्याला गोळा करून द्यावे असा प्रचार करतात. तसेच अनेक शाळा , महाविद्यालये, अनेक सामाजिक संस्था यांच्याबरोबर एकत्र काम करून प्लास्टिक-त्रिसूत्रीचा रीड्युस, रीयुज, रीसायकल आणि आता रीफ्युज प्रचार करत आहेत.
या कार्यात कैलास,सुखदा देशपांडे हे दांपत्य ईकचरा, जुने कपडे, थर्माकोल, शूज, चपला, टेट्रापेक्स, डोंबिवली , कल्याण येथून जमा करून अनेक संस्थांना सुपूर्द करित आहेत.