शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुन्हा मुख्यमंत्रिपद?; पंतप्रधान मोदी घेणार निर्णय
2
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
3
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
4
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले
6
Maharashtra Assembly Election Result 2024: लोकमताचा ‘महा’कौल! कमळ फुलले, अन् धनुष्यबाण, घड्याळ खुलले; मुख्यमंत्री कोण?
7
सर्व पोल पंडितांचे अंदाज खोटे ठरले, महायुतीचा महाविजय; महाविकास आघाडी चारीमुंड्या चीत
8
कोमेजलेले कमळ फुलले! फडणवीसांचे मार्गदर्शन, बावनकुळेंची मेहनत, अन्‌ पक्षजनांनी केली कमाल
9
ठाणे एकनाथ शिंदेंचे, तर मुंबई भाजप आणि उद्धव ठाकरेंची; काँग्रेसची अवस्था बिकट
10
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
11
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
12
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
13
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
14
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
15
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
16
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
17
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
18
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
19
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
20
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...

पत्रकारांचीही होणार चौकशी, अनेकांची नावे उघड, पक्ष कार्यालयात तपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 12:52 AM

बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी स्वीकारल्याप्रकरणी अटकेत असलेली माहिती अधिकार कार्यकर्ती चारु शीला पाटील हिच्या चौकशीदरम्यान अनेक नावे बाहेर येऊ लागली आहेत

कल्याण : बांधकाम व्यावसायिकाकडून खंडणी स्वीकारल्याप्रकरणी अटकेत असलेली माहिती अधिकार कार्यकर्ती चारु शीला पाटील हिच्या चौकशीदरम्यान अनेक नावे बाहेर येऊ लागली आहेत. त्यात काही पत्रकारांचीही चौकशी होणार आहे.ठाकुर्ली-चोळेगाव येथे राहणारे बांधकाम व्यावसायिक सुरेंद्र पाटील यांच्याकडून चारु शीला हिने ५० लाख रु पयांची खंडणी मागितली होती. त्यात तडजोड होऊन २५ लाख देण्याचे ठरले होते. यातील दोन लाख रुपये चारु शीला हिने आधी घेतले होते. उर्वरित तीन आणि पाच लाखांचे धनादेश स्वीकारताना ठाणे खंडणीविरोधी पथकाने तिला रविवारी अटक केली. कल्याण सत्र न्यायालयाने तिला १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. चौकशीदरम्यान काही महत्त्वाची माहिती पुढे आली आहे.महापालिका मुख्यालयातील राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते कार्यालयातून पाटील हिने अनेक तक्र ार अर्ज केले असल्याचेही पोलीस तपासात उघड झाले आहे. तसेच तक्रारदार सुरेंद्र पाटील व चारुशीला पाटील यांच्यातील देण्याघेण्याची बातचीतही या ठिकाणीच झाल्याचेही उघड झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस गटनेते कार्यालयातील खाजगी सचिवाला तसेच तेथील शिपायालाही खंडणीविरोधी पथकाच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावल्याने खळबळ उडाली आहे.दरम्यान, तिच्या झालेल्या चौकशीत काही पत्रकारांची नावेही उघड झाली असून त्यांचीही चौकशी होणार असल्याचे वृत्त आहे. त्या पत्रकारांचा या खंडणी प्रकरणाशी संबंध आहे का, हे देखील तपासले जाणार आहे.