ठाणे : संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांच्या संकल्पनेतून नवोदित आणि हौशी कलाकारांना रंगमंच उपलब्ध करून देणारा विक्रमी अभिनय कट्ट्याने अभिनयाची चुणूक दाखवण्याची एक सुवर्णसंधी राज्यातील कलाकारांसाठी उपलब्ध करून दिलेली आणि या स्पर्धेत राज्यातील कानाकोपऱ्यातून आलेल्या 4 वर्षाच्या चिमुरड्यापासून ते ७५ वर्षाच्या आजीनी सहभाग घेऊन स्पर्धेत रंगत भरली.
सदर स्पर्धेत विविध वयोगटाच्या आणि राज्यातील विविध भागातून आलेल्या स्पर्धकांनी सहभाग घेतला.स्पर्धेमध्ये स्पर्धकांनी वेगवेगळ्या विषयांवर सादरीकरण केले.गाजलेली नाट्यस्वागतासोबतच विविध सामाजिक राजकीय प्रश्नांवर भाष्य करणाऱ्या एकपात्रीचे स्पर्धकांनी सादरीकरण केले.सादर स्पर्धेला *ज्येष्ठ रंगकर्मी विजय मोंडकर आणि ज्येष्ठ लेखक डॉ. र.म.शेजवलकर ह्यांनी सदर स्पर्धेचे परिक्षण केले.परीक्षकांच्या मते स्पर्धा खूपच रंगतदार झाली स्पर्धकांनी खूप सुंदर रित्या सादरीकरण केले.सदर स्पर्धेत *अवंतिका चौगुले हिने प्रथम क्रमांक मंगेश खैरे ह्याने द्वितीय क्रमांक आणि साक्षी मणचेरकर हिने तृतीय क्रमांक पटकावला.तसेंच सिद्धेश शिंदे ह्याने प्रथम उत्तेजनार्थ आणि किशोर धडाम ह्याने द्वितीय उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.आर्या मोरे ह्या चिमुरडीला विशेष उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. सदर स्पर्धेच्या पारितोषिक वितारणास सुप्रसिद्ध दिग्दर्शक जयंत पवार आणि अभिनेत्री सुषमा रेगे उपस्थित होत्या. एकपात्री अभिनय स्पर्धा ही अभिनय क्षेत्रात स्वतःला सिद्ध करण्याची पहिली पायरी असतेच सोबत रंगीत तालीम सुद्धा असते.स्पर्धकांनी अशा स्पर्धा खूपच गंभीर रित्या घेतल्या पाहिजेत कारण कलाकार ह्यातूनच प्रगल्भ होतो.एक कलाकार म्हणून प्रगल्भ होण्यासाठी मेहनत आणि अभ्यास ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत असे मत दिग्दर्शक जयंत पवार ह्यांनी व्यक्त केले. कलासृष्टीत स्वतःच अस्तित्व निर्माण करण्याचा संघर्ष मी अनुभवलाय.कलाकारासाठी रंगमंच आणि संधी खूप गरजेची असते.म्हणूनच ही स्पर्धा विनामूल्य आयोजित करण्यात आली होती जेणेकरून सर्वसामान्य स्पर्धकाला सुद्धा सहभाग घेता येईल .ह्या स्पर्धेला राज्यभरातून मिळालेला हा प्रतिसाद आणि प्रत्येक वयोगटातील स्पर्धकांच्या डोळ्यातील आनंद एक रंगकर्मी म्हणून मला समाधान देऊन गेले असे मत अभिनय कट्ट्याचे संस्थापक अध्यक्ष किरण नाकती ह्यांनी व्यक्त केले.