लोकमत न्यूज नेटवर्कठाणे: वाघबीळ भागातील एका दुकानाचे शटर उचकटून इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चोरी करून पसार झालेल्या अमोल इंगळे (२९, रा. मानपाडा, ठाणे) याला अवघ्या १२ तासांमध्येच अटक करण्यात कासारवडवली पोलिसांना यश आले आहे. त्याच्याकडून ५५ हजारांचा मुद्देमालही हस्तगत केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांनी मंगळवारी दिली.वाघबीळ येथे न्यू कैलास इलेक्ट्रीक अँड सॅनेटरी हे दुकान आहे. मंजी चौधरी या दुकान मालकाने २२ फेब्रुवारी रोजी रात्री त्याचे दुकान बंद केले. २३ फेब्रुवारी रोजी सकाळी त्यांनी दुकान उघडले असता त्यांना दुकानातील पंखे, गिझर आणि एलईडी ट्यूबलाईट असा सुमारे ५५ हजारांचा ऐवज चोरीला गेल्याचे आढळले. त्यानुसार चौधरी यांनी याप्रकरणी कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. दरम्यान, यातील संशयित आरोपी अमोल हा चितळसर मानपाडा येथील भवानी नगर परिसरात वास्तव्यास असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांना मिळाली. याच माहितीच्या आधारे सहायक पोलीस निरीक्षक शहदेव पालवे यांच्या पथकाने सापळा रचून अमोल याला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने या चोरीची कबूली दिली. त्याच्याकडून दहा हजारांचे ५० एलईडी ट्यूबलाईट, १५ हजारांचे १० पंखे आणि ३० हजारांचे १२ गिझर असा ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अमोल हा अशा चोºया करण्यात माहीर असून त्याने यापूर्वी कोणत्या ठिकाणी चोºया केल्या याचाही तपास करण्यात येत असल्याचे खैरनार यांनी सांगितले.
अवघ्या १२ तासांमध्ये कासारवडवली पोलिसांनी लावला चोरीचा छडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 7:49 PM
वाघबीळ भागातील एका दुकानाचे शटर उचकटून इलेक्ट्रॉनिक वस्तूंची चोरी करून पसार झालेल्या अमोल इंगळे (२९, रा. मानपाडा, ठाणे) याला अवघ्या १२ तासांमध्येच अटक करण्यात कासारवडवली पोलिसांना यश आले आहे.
ठळक मुद्दे दुकानात चोरी करणाऱ्यास अटक ५५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत