शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha: आतापर्यंत कोणत्या पक्षाचा स्ट्राइक रेट राहिला सर्वाधिक?
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कामात यशस्वी व्हाल, आर्थिक लाभ होण्याची शक्यता!
3
IND vs AUS : बुमराहच्या नेतृत्वाखाली या दोन नव्या चेहऱ्यांना मिळाली पदार्पणाची संधी
4
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘एक्झिट पोल’ इतके गोंधळलेले का आहेत?
5
‘ती’ वादग्रस्त विधाने आयोगाच्या रडारवर; केंद्रीय मुख्य आयुक्तांनी मागवले अहवाल
6
सत्ता आमचीच! सत्ताधारी महायुती आणि विरोधी मविआच्या नेत्यांचे दावे 
7
टक्क्याचा धक्का कुणाला? निवडणुकीत मतदारांमध्ये सुप्त लाट
8
Maharashtra Vidhan Sabha ELection 2024: मुंबईत कोणत्या शिवसेनेसाठी मतटक्का वाढला?
9
अदानींवर अमेरिकेत लाचप्रकरणी खटला; आरोप निराधार, आम्ही निर्दोष : अदानी
10
सत्ता स्थापनेच्या संभाव्य शक्यतांवर खलबते सुरू; निवडून येऊ शकणाऱ्या अपक्षांबाबतही चर्चा
11
स्ट्राँग रूमवर तिसऱ्या डोळ्याचे लक्ष; मुंबई, ठाणे, रायगड, पालघरमध्ये मतदानयंत्रे कडेकोट बंदोबस्तात
12
शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना: जयदेव आपटेंच्या याचिकेवरील सुनावणी तहकूब
13
बारावी ११ फेब्रुवारी, दहावी परीक्षा २१ फेब्रुवारीपासून; व्हायरल वेळापत्रकावर विश्वास न ठेवण्याचे बोर्डाचे आवाहन
14
यूजीसी नेट परीक्षा जानेवारीत होणार; १० डिसेंबरपर्यंत अर्ज भरता येणार
15
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
16
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
17
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
18
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
19
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
20
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?

नुसत्याच गप्पा : १२ वर्षांत लाेकलही वाढल्या नाहीत

By पंकज पाटील | Published: August 23, 2024 12:45 PM

लोकसंख्या चार लाख झाली, लाखो प्रवाशांकरिता केवळ एक शौचालय, शाळेतील अत्याचाराचा रोष रेल्वेमार्गात प्रकटला

- पंकज पाटीलबदलापूर : बदलापूरची लोकसंख्या चार लाखांच्या आसपास झाली. लोकसंख्या केवळ एक वर्षात एक लाखाने वाढली. परंतु बदलापूरहून सुटणाऱ्या लोकलच्या संख्येत मात्र १२ वर्षांत वाढ झालेली नाही. स्थानकातील सुविधांमध्येही गेल्या पाच वर्षांत तसूभरही वाढ झालेली नाही. त्यावरून धुमसणाऱ्या असंतोषात शाळेतील लैंगिक अत्याचार प्रकरणाने निर्माण झालेल्या रोषाची भर पडली आणि त्यातूनच गेल्या मंगळवारी जनक्षोभ उफाळून आला, अशी कबुली आता बदलापूरमधील रेल्वे प्रवासी देत आहेत.

गेल्या पाच वर्षांत बदलापूर शहराची लोकसंख्या कित्येक लाखांनी वाढली. मात्र, बदलापूरहून मुंबईला जाणाऱ्या लोकल फेऱ्याची संख्या येऊन जाऊन ५८ आहे. त्यात २०१२ पासून वाढ झालेली नाही, अशी माहिती रेल्वे प्रवासी संघटनेचे पदाधिकारी संजय मेस्त्री यांनी दिली.  दिव्यातील लोकांनी सहा - सात वर्षांपूर्वी उद्रेकाचे दर्शन घडवल्यावर तेथे जलद लोकलला थांबा मिळाला. मात्र, बदलापूरचे प्रवासी सोशिक असल्याने त्यांना गृहीत धरले जात असल्याची खदखद प्रवाशांत होती. काही कल्याण लोकलचा प्रवास बदलापूरपर्यंत वाढवून बदलापूर लोकलची संख्या वाढवण्याची प्रवाशांची मागणी मान्य झाली नाही.

होम प्लॅटफॉर्मचे काम अपूर्णचबदलापूर रेल्वे स्थानकात होम प्लॅटफॉर्म उभारण्यासाठी गेल्या सहा वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. मात्र, या प्लॅटफॉर्मचे काम अद्याप पूर्णत्त्वास गेलेले नाही. हा प्लॅटफॉर्म वापरला जात असला तरी तिथे सुविधा पुरवण्यात आलेल्या नाहीत.

स्थानकाकडे जाणारा मार्ग अरुंदबदलापूर पूर्व आणि पश्चिम भागात रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी जो मार्ग आहे तो अरुंद ठेवण्यात आला आहे. त्यामुळे गर्दीच्या वेळेस स्थानकाच्या आत जाणे आणि स्थानकातून बाहेर पडणे अवघड जाते. त्यातूनही प्रवाशांच्या मनात रोष निर्माण झाला असल्याचे सांगण्यात येते.  

रिक्षाचालकांची दादागिरीरेल्वे स्थानकात येण्यासाठी आणि स्थानकातून घराकडे जाताना रिक्षा पकडताना प्रवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो. रिक्षा चालकांची मुजोरी वाढली आहे. मनमानी पद्धतीने भाडेआकारणी केली जाते.

सरकते जिने लावले, काढले    रेल्वे स्थानकामध्ये नव्याने सरकते जिने लावण्यासाठी रेल्वे प्रशासनाने पुढाकार घेतला होता. मात्र, बदलापूर रेल्वे स्थानकात चुकीच्या ठिकाणी सरकते जिने लावल्यामुळे त्याचा प्रवाशांना कुठलाही लाभ झाला नाही.     प्रवासी त्या जिन्यांचा वापर करीत नव्हते. त्यामुळे प्रवाशांमधून या सरकत्या जिन्याबाबत संताप व्यक्त होत होता. त्यामुळे लावलेले जिने रेल्वेने काही दिवसातच काढून टाकले.

टॅग्स :badlapurबदलापूरMumbai Localमुंबई लोकल