सदानंद नाईक, उल्हासनगर : महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांची शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेऊन टीडीआरसह विकास कामात होत असलेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची मागणी केली. माजी महापौर पंचम कलानी, कमलेश निकम, शिवाजी रगडे, अजित माखीजानी आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
उल्हासनगर महापालिका आयुक्त पदी मनिषा आव्हाळे यांची नियुक्ती झाल्यानंतर कलानी समर्थकांनी बुधवारी दुपारी भेट घेवून, शहरांत होत असलेल्या विकास कामे व त्यातील अनियमितात बाबत चर्चा केली. भुयारी गटार व पाणी पुरवठा वितरण योजनेसह अन्य विकास कामाच्या नावाखाली संपूर्ण शहरात रस्ते खोदण्यात येते आहेत. मात्र खोदलेले रस्ते त्वरित दूरस्त करावी, पाणी पुरवठा मध्ये नियमितता, नगररचनाकार विभागातील १०० कोटींचा टीडीआर घोटाळा, कॉलब्रो सर्वेक्षण घोटाळा, विकास कामे वेळेत पूर्ण करण्याची मागणी निवेदनाद्वारे कलानी समर्थक व शरद पवार गटाच्या शिष्टमंडळाने आयुक्ताना केली. यावेळी माजी महापौर पंचम कलानी, कमलेश निकम, शिवाजी रगडे, अजित माखीजानी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
आमदार आयलानी यांनी घेतली आयुक्ताची भेट
महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांची आमदार कुमार आयलानी यांनी सदिच्छा भेट घेऊन, शहरातील विकास कामासह अन्य रेंगाळलेल्या योजना वेळेत पूर्ण करण्याची मागणी केली. आयलानी यांनी शहरातील पाणी टंचाई, खोदलेले रस्ते, अर्धवट विकास कामे आदीची माहिती देत विकास कामे वेळेत पूर्ण करण्याची मागणी केली.