ठाणे - महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात आरोग्य कर्मचाऱ्यांनी रुग्णलाय अधिष्ठातांना घेराव घालून आपला निषेध व्यक्त केला. सुमारे ५० नर्स, वॉर्ड बॉय आणि इतर कर्मचाऱ्यांना वरिष्ठांकडून त्रास होत असून कामावरून घरी जाण्यासाठी वाहन व्यवस्था दिली जात नाही. ज्या नर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाचा लागण झाली आहे, त्यांना योग्य सुविधा दिल्या जात नाहीत. याचा निषेध म्हणून मंगळवारी दुपारी सर्व कर्मचाऱ्यांनी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. प्रतिभा सावंत यांना घेराव घालून आपला निषेध व्यक्त केला.यावेळी सुमारे अर्धा तास काम बंद आंदोलन केले. डॉ. सावंत यांनी आंदोलांकर्त्यांशी चर्चा करून मागण्यांचे लेखी निवेदन देण्यास सांगितले. त्यामुळे आंदोलकांनी मागण्यांचे निवेदन दिल्यानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
कळवा रुग्णालय कर्मचाऱ्यांचा अधिष्ठातांना घेराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 2:31 PM