शहरं
Join us  
Trending Stories
1
Irani Cup 2024 : रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 'अजिंक्य'! २७ वर्षांचा दुष्काळ संपवला अन् इराणी चषक उंचावला
2
Narendra Modi : "काँग्रेसपासून सावध राहा, कारण..."; महाराष्ट्रातून पंतप्रधान मोदींनी केलं आवाहन
3
"आधी इराणच्या अणुकेंद्रांवर हल्ले करा", डोनाल्ड ट्रम्प यांचा इस्रायलला सल्ला
4
हरियाणात काँग्रेस किती जागा जिंकणार? अशोक तंवर यांचं मोठं भाकीत
5
कोण आहेत शैलजा पाईक?; ज्यांना मिळाली तब्बल ७ कोटींची फेलोशिप, पुण्याशी कनेक्शन
6
सेबी प्रमुख माधबी बूच यांच्या अडचणी वाढल्या, संसदेच्या वरिष्ठ समितीने बजावले समन्स
7
इस्रायल-इराण संघर्षाचा परिणाम भारतावर होणार, सर्वसामान्यांच्या अडचणी वाढणार!
8
SBI On MTNL: संकटात आली 'ही' सरकारी कंपनी; आता SBI नं केली मोठी कारवाई, शेअर आपटला
9
जेव्हा रितेशने जिनिलीयासोबत केलेलं ब्रेकअप, अभिनेत्रीची झालेली वाईट अवस्था, म्हणाली- "त्याने मला मेसेज करून..."
10
भारतीय क्रिकेटरच्या वडीलांची २६ लाखांची फसवणूक; पैसे परत मागताच जीवे मारण्याची धमकी
11
"पाहिजे तेवढ्या फिती कापा, दीड महिन्याने..."; PM मोदींच्या दौऱ्यावरुन उद्धव ठाकरेंचा घणाघात
12
छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारा म्हणजे संविधान; राहुल गांधींचा भाजपावर घणाघात
13
१० रुपयांचं चॉकलेट, देवाचं दर्शन अन्...; अमेठी हत्याकांडात खळबळजनक खुलासा
14
हार्दिक पांड्याशी घटस्फोटानंतर नताशाचं जबरदस्त कमबॅक, शूटिंग सेटवरील व्हिडिओ समोर
15
शरद पवारांची साथ सोडून काँग्रेसमध्ये गेलेल्या महिला नेत्याशी व्यासपीठावर छेडछाड
16
मैत्रीचा इतिहास: पाकिस्तान कदापी अण्वस्त्रधारी बनू शकला नसता; भारतावर आरोप झाला, इस्रायलने थेट अंगावर घेतला
17
Weightloss Tips: अमित शाहांनीसुद्धा 'या' पद्धतीने केले २५ किलो वजन कमी; सांगताहेत बाबा रामदेव!
18
IPO च्या तयारीत असलेल्या NSE ला सेबीकडून दिलासा; SEBIच्या इतिहासातील मोठ्या सेटलमेंटसाठी मंजुरी
19
बायकोसाठी गाव सोडणार नाही तर बदलणार! आदिनाथ कोठारेच्या 'पाणी'चा हृदयस्पर्शी ट्रेलर रिलीज
20
करुन दाखवलं! दहावी, बारावी नापास पण वयाच्या २२ व्या वर्षी मिळवलं यश, झाली IAS

कळवा-मुंब्रा हाच अडथळा

By admin | Published: January 05, 2017 5:53 AM

ठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता ठाणे शहरात आघाडी तर कळवा, मुंब्य्रात मैत्रीपूर्ण लढती, असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने आपला मित्रपक्ष काँग्रेसला दिला असला

अजित मांडके, ठाणेठाणे महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता ठाणे शहरात आघाडी तर कळवा, मुंब्य्रात मैत्रीपूर्ण लढती, असा प्रस्ताव राष्ट्रवादी काँग्रेसने आपला मित्रपक्ष काँग्रेसला दिला असला तरी या दोन्ही पक्षांची भिस्त ही कळवा-मुंब्रा या परिसरावर असल्याने हाच मुद्दा आघाडी होण्यात अडसर ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. सत्ताधारी शिवसेना आणि भाजपामधील स्थानिक नेत्यांना युती हवी असली तरी सत्तेपासून दूर असलेली मंडळी स्वबळाची भाषा करीत आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून देखील आघाडीबाबत चाचपणी सुरु झाली आहे. ठाण्यातील काँग्रेसचे संघटन कमकुवत असून एकच चेहरा मतदारांपुढे नाही. अनेक नगरसेवकांनी यापूर्वीच शिवसेना अथवा भाजपामध्ये प्रवेश केला आहे. काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे गटनेते राजण किणे यांनीच राष्ट्रवादीत प्रवेश केला. विधानसभा निवडणुकांपासून काँग्रेसला फुटीचा सामना करावा लागत आहे. राष्ट्रवादीची स्थिती काँग्रेसपेक्षा बरीच चांगली आहे. आमदार जितेंद्र आव्हाड हे सध्या पक्षाचा चेहरा बनले आहेत. ठाण्यात त्यांचीही चांगलीच पडझड झाली आहे. कोपरी, शहरातील काही भागातील नगरसेवकांनी शिवसेना आणि भाजपामध्ये यापूर्वीच प्रवेश केला आहे. उमेदवारांचा शोध दोन्ही पक्ष घेत असले तरी काँग्रेसने उमेदवारांकरिता चक्क वृत्तपत्रात जाहीरात दिली होती. सद्य राजकीय परिस्थिती आणि नगरपालिका निवडणुकींचा लागलेला निकाल पाहूनच ठाण्यात दोन्ही काँग्रेसनी आघाडीचा निर्णय घेतला असल्याचे समजते. मात्र आघाडी केवळ ठाणे शहरापुरती मर्यादीत ठेवायची आणि कळवा, मुंंब्य्रात मैत्रीपूर्ण लढतीचा विचार राष्ट्रवादीच्या गोटात व्यक्त होत आहे. कळव्यात राष्ट्रवादीचे प्राबल्य आहे. कळवा, मुंब्य्रातून ३६ नगरसेवक पालिकेवर निवडून जाणार आहेत. त्यामुळेच यामध्ये अधिकाधिक जागा आपल्याकडे असाव्यात, अशी दोन्ही पक्षांची इच्छा आहे. शिष्टाईचे शरद पवार यांचे संकेतठाणे : मुंब्रा पारसिक रेतीबंदर येथे चौपाटी उभी करण्याच्या निर्णयाचे शरद पवार यांनी बुधवारी स्वागत करतानाच महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याशी याबाबत संवाद साधणार असल्याचे स्पष्ट केले. मुंब्रा येथे चौपाटी उभी करण्याकरिता अतिक्रमणांवर कारवाई करण्यास राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र विरोध केल्याने विधान परिषदेत सभापतींनी कारवाईला स्थगिती दिली होती. त्यानंतर आयुक्त जयस्वाल यांनी रेतीबंदरचे अस्तित्व शिल्लक राहणार नाही, असे वक्तव्य केल्याने महापालिकेच्या महासभेत कारवाईचे समर्थन करणारा ठराव एकमताने मंजूर झाला होता. त्याला पाठिंबा देणाऱ्या राष्ट्रवादीच्या नगरसेवकांना पक्षाने राजीनामे देण्यास भाग पाडले. त्याचबरोबर आयुक्तांविरुद्ध आणि ठरावाच्या सूचक-अनुमोदकांविरुद्ध हक्कभंग दाखल करण्याच्या हालचाली सुरु केल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर पवार यांनी चौपाटी उभी करण्याचे स्वागत करतानाच तेथे ५० वर्षांपासून राहणाऱ्या आणि व्यवसाय करणाऱ्या नागरिकांचे पुनर्वसन होणे गरजेचे असल्याचे सांगितले. या लोकांचे जवळच असलेल्या रिकाम्या भूखंडावर पुनर्वसन करावे. याबाबत मी स्वत: आयुक्त जयस्वाल यांच्याशी संवाद साधणार असल्याचे ते म्हणाले.मुंब्य्रात रस्ते, पिण्याचे पाणी अशा प्रमुख समस्या आहे. आम्ही सत्तेत नसलो तरीही ठाणे पालिकेच्यावतीने पिण्याच्या पाण्याची समस्या सोडविण्यासाठी प्रस्ताव बनवून दिल्लीत पाठवू. (प्रतिनिधी)