- मुरलीधर भवार कल्याण - वाहतूक पोलिसांनी त्याची गाडी टोईंग केली. त्याने त्याचा पोलिसांना जाब विचारण्याऐवजी पोलिसांच्या या कारवाईच्या निषेधार्थ तो चक्क वाहतूक पोलिसांचा गाडी खालीच जाऊन झोपला. हा प्रकार कल्याण पश्चिमेतील खडकपाडा घडला. हा सगळा प्रकार एकाने त्याच्या मोबाईलमध्ये कैद केला. त्याचा व्हीडीआे सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
वाहतूक पोलिसांकडून वाहतूकीचे नियम मोडणाऱ््या वाहन चालकांच्या विरोधात कारवाई सुरु असेत. खडकापाडा परिसरात अशाच एका वाहन चालकाच्या विरोधात पोलिसांनी कारवाई केली. त्याची गाडी टोईंग केली. पोलिसानी टोईंग केलेली गाडी पोलिसांकडून कशी काय सोडवायची. त्याचा फाईनपण भरावा लागणार नाही. यासाठी त्याने शक्कल लढविली. तो गेला आणि पोलिसांच्या गाडी खालीच झोपला. त्याने गाडी खाली झोपून घेतल्याने वाहतूक पोलिसांना गाडी पुढे काढण्यासाठी कोणताही मार्ग राहिला नाही. वाहतूक पोलिसांनी त्याची टोईंग केलेली गाडी सोडून दिली. त्यांच्यासमोर असा दुसरा कोणताही पर्याय राहिला. त्याची टोईंग केलेली गाडी पोलिसांनी सोडून देताच. गाडी खाली झोपलाला व्यक्ती बाहेर आला. त्याने त्याची गाडी घेऊन घरी गेला.
काही दिवसापूर्वी एका रिक्षा चालकाच्या विरोधात वाहतूक पोलिसांनी कल्याण डोंबिवली महापालिका कार्यालयासमोरच कारवाई केली होती. तेव्हा रिक्षा चालक आणि वाहतूक पोलिसात बरीच हमरातुमरी झाली होती. रिक्षा चालकाने तो राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असल्याचे सांगत पोलिसांच्या कारवाईस विरोध करीत पोलिसाला अद्दल घडविण्याची भाषा केली होती. त्यानंतर आज पुन्हा हा प्रकार घडल्याने वाहतूक पोलिसांकडून होत असलेल्या कारवाईस वाहन चालकांकडून विविध प्रकारे विरोध असतो. हेच या घटनेतून उघड झाले आहे.