- मुरलीधर भवारकल्याण - कल्याण पूर्वेतील महापालिकेच्या हरकीसन दास रुग्णालयातून रुग्णांना योग्य प्रकारच्या आराेग्य सोयी सुविधा आणि उपचार मिळत नसल्याच्या निषेधार्थ भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी ठिय्या आंदोलन केले आहे. जुन्या रुग्णालयात सोयी सूविधा मिळत नसताना नवी रुग्णालये उभारुन जनतेच्या पैशाच्या भ्रष्टाचर करीत उधळपट्टी करु नका अशी मागणी आमदार गायकवाड यांनी केली आहे.
जाणीव या समाजिक संस्थेचे प्रथमेश सावंत यांनी महापालिकेच्या हरकीसन दास रुग्णालयातून नागरीकांना योग्य प्रकारे आरोग्य सेवा सुविधा आणि उपचार मिळत नसल्याची बाब आमदारांच्या निदर्शनास आणून दिली होती. त्यांच्या सोबतीने आमदार गायकवाड यांनी रुग्णालयात ठिय्या मांडला. या रुग्णालयात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. तसेच प्रसानधगृहाची दुरावस्था आहे. योग्य प्रकारे उपचार मिळत नाही. हे विविध प्रश्न आहेत.
महापालिकेची अस्तित्वात असलेली रुग्णालये यामध्ये डा’क्टर आणि नर्सचा पुरेसा स्टाफ नाही. तो स्टाफ भरला जात नाही. तसेच नागरीकांनी उपचार योग्य प्रकारे मिळत नाही. या समस्या आहेत. या समस्या दूर करण्याऐवजी महापालिका प्रशासनाकडून नवी रुग्णालयेच उभारण्याचा घाट घातला जातो. आहे त्या रुग्णलयात योग्य प्रकार उपचार मिळत नाही. मग आणखीन नव्या रुग्णालयांचा घाट कशासाठी असा सवाल आमदारांनी उपस्थित केला आहे. जनतेच्या कर रुपी पैशातून सेवा सुविधा देण्याऐवजी नव्या रुग्णालय बांधणीत भ्रष्टाचार करुन जनतेच्या पैशाची उधळपट्टी करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न अत्यंत निषेधार्थ आहे. आमदारांनी केलेल्या ठिय्या आंदोलनाची माहिती मिळताच अधिकारी वर्गाने त्याठिकाणी धाव घेतली. आमदारांनी या अधिकारी वर्गास जाब विचारत आरोग्याच्या असुविधांबाबत संताप व्यक्त केला. अधिकारी वर्गाकडून आरोग्य सुविधा पुरविण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.