- मुरलीधर भवार कल्याण - ज्येष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत कल्याण पूर्वेकडील सम्राट अशोक विद्यालयात बाल साहित्य संमेलन संपन्न झाले.
बाल साहित्य संमेलनाची सुरुवात इयत्ता सहावीच्या मुलींनी मराठी लोकगीतांच्या नृत्यकलेने केली.यावेळी बहिणाबाई चौधरी, सावित्रीबाई फुले, अण्णाभाऊ साठे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज ,संत तुकाराम महाराज, साने गुरुजी, संत मुक्ताबाई, वि वा शिरवाडकर ,प्र के अत्रे साने गुरुजी अशा साहित्यिकांच्या भूमिकेत विद्यार्थी अवतरले होते. साहित्यिकांचे साहित्य यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केले साहित्यिकांचे साहित्य सादर केल्यामुळे लेखक, कवी यांची ओळख विद्यार्थ्यांना झाली.
बालसाहित्य संमेलनाचे अध्यक्ष इयत्ता नववीचा विद्यार्थी यश जाधव होता .सूत्र संचालन स्नेहल आगवणे व आभार भूमिका पवार या इयत्ता नववीच्या विद्यार्थिनीने मानले. माध्य. विभागाचे मुख्याध्यापक गुलाबराव पाटील प्राथ. विभागाच्या मुख्याध्यापिका सुजाता नलावडे प्रमुख मान्यवरांच्या भूमिकेत होते. शिक्षकांसह विद्यार्थी यावेळी रसिकांच्या भूमिकेत होते.संमेलन यशस्वी करिता सह शिक्षिका विजया तांबे तर सहशिक्षक ओमप्रकाश धनविजय यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.